कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण स्टार प्रवाहवर २८ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेतून प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थातच गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव नव्या रुपात भेटीला येणार आहेत. मालिकेच्या कथानकाविषयी दिवसेंदिवस उत्कंठा वाढत चालली आहे. या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू कावेरी सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. …