no images were found
‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत कैरीने युगकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली
मुंबई,: सोनी सबवरील ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ या मालिकेतील भावनांचे चढ-उतार, नाट्य आणि युग (शब्बीर अहलूवालिया) व कैरी (आशी सिंह) यांच्यातील गुंतागुंतीचे नाते यामुळे प्रेक्षकांना मालिका आवडली आहे. अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की कैरीने भावा-भावांतील भांडण मिटवले आणि त्यामुळे त्यांनी युगसोबत दर वर्षीप्रमाणे रक्षाबंधन साजरे केले.
आगामी भागांमध्ये, प्रेक्षक पाहतील की युग आणि कैरी शौर्य (अभिषेक वर्मा) आणि अन्या (मौसमी देवनाथ) यांच्या विवाहासाठी अन्याच्या आईचे म्हणजे शालिनीचे मन वळवण्यात यशस्वी होतात. अन्याला परत मिळवण्यासाठी शौर्य एक आगळीवेगळी अट घालतो. तो शालिनीला त्यांच्यासोबत सात दिवस राहायला सांगतो, जेणेकरून तिची खात्री पटेल की, युग आणि कैरीचे लग्न म्हणजे केवळ एक नाटक नाही, तर ते सर्व जण किती आनंदाने एकत्र राहतात. शौर्यचे बोलणे खरे करून दाखवण्यासाठी सगळेजण आपापली भूमिका बजावू लागतात आणि तसे करता करता त्यांच्या नात्याला अनपेक्षित भावनिक वळण मिळते. या नाट्यात, कैरी युगकडे आपल्या प्रेमाची कबुली देण्याचे धाडस गोळा करते.
युग देखील तिच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करेल का, की कैरीचा हिरमोड करून तो पाठ फिरवून निघून जाईल?
‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत कैरीची भूमिका करणारी आशी सिंह म्हणते, “युगचा प्रामाणिकपणा आणि कनवाळू स्वभाव याबद्दल कैरीला पहिल्यापासून युगचा आदर वाटत आला आहे. तो बाहेरून कितीही तुटक असल्याचे दाखवत असला, तरी तो खरा जसा आहे, त्याबद्दल त्याला प्रेम मिळाले पाहिजे असे तिला वाटते. पुढील काही एपिसोड खूप उत्कंठावर्धक असतील, कारण तो क्षण प्रेक्षक अखेर बघतील, जेव्हा कैरी आपल्या भावना युगकडे व्यक्त करेल. तिच्यासाठी हे एक भावनिक आणि धाडसी पाऊल आहे. युगसारख्या काहीशा उग्र व्यक्तिमत्वावर प्रेम करणे काही तितकेसे सोपे नाही. पण कित्येकदा इतरांना न दिसणाऱ्या गुणांची दखल घेऊन त्याचे मूल्य ओळखणे म्हणजेच तर प्रेम असते!”