no images were found
यंदा इंटरनॅशनल डे निमित्त एण्ड टीव्ही कलाकारांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांबाबत सांगितले!
कुत्रे पाळीव प्राण्यांपेक्षा अधिक आहेत, ते तणाव दूर करणारे आणि अतूट प्रेमाचे सोबती आहेत. यंदा इंटरनॅशनल डॉग डे निमित्त एण्ड टीव्हीवरील आपले लाडके कलाकार त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबतचे खास नाते आणि ते आसपास असताना जीवन कशाप्रकारे आनंददायी होते याबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत पारस अरोरा (जीतू, ‘घरवाली पेडवाली’), गीतांजली मिश्रा (राजेश, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि सोमा राठोड (अम्मा, ‘भाबीजी घर पर है’). आगामी मालिका ‘घरवाली पेडवाली’मधील पारस अरोरा ऊर्फ जीतू म्हणाले, “माझ्या जिवलग मित्राकडे दोन कुत्रे आहेत, डस्टी व ओरियो आणि मला ते खूप आवडतात. ते माझ्यासाठी कुटुंबासारखे आहेत आणि वेळ मिळाला की मी त्यांच्यासोबत वेळ व्यतित करतो. त्यांच्यासोबत धावतो, त्यांना फिरायला घेऊन जातो, त्यांच्याजवळ प्रेमाने बसतो. हे क्षण मला खूप आनंद देतात. त्यांनी माझ्यावर बिनशर्त केलेले प्रेम व ऊर्जा अत्यंत हृदयस्पर्शी आहे.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्हणाल्या, “मला कुत्रे खूप आवडतात आणि माझा बम बम मला मुलासारखा आहे. त्याच्या अनोख्या भुंकण्याने मला भगवान शिवच्या ‘बम बम भोले’ची आठवण झाली, ज्यामुळे मी त्याचे नाव बम बम ठेवले. त्याच्या उपस्थितीने माझ्या घरामध्ये सकारात्मक वातावरण असते आणि मी दिवसभर कामामुळे कितीही थकून गेले असले तरी तो मला उत्साहित करतो. मी कुत्रे असलेल्या मित्रमैत्रिणींकडे जाते तेव्हा त्यांच्यासोबत अधिक वेळ व्यतित करते, ज्यासाठी माझे मित्रमैत्रिण माझी मस्करी करतात. इंटरनॅशनल डॉग डे निमित्त मी संदेश देऊ इच्छिते की या मुक्या प्राण्यांवर दया व प्रेम दाखवा, ज्यामुळे हे जग त्यांच्यासाठी अधिक दयाळू बनू शकते,” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाबी म्हणाल्या, “माझा कुत्रा फॉक्सी फक्त पाळीव प्राणी नाही तर माझा जिवलग मित्र व कुटुंब आहे. त्याचा उत्साही स्वभाव, प्रामाणिकपणा आणि तो ज्याप्रकारे माझा मूड समजून घेतो त्यामधून मला खूप आनंद होतो. दिवसभर कितीही काम केले असले तरी फॉक्सीकडे पाहताच मी उत्साहित होते. तो माझ्या घरामध्ये सकारात्मकता घेऊन येतो. माझा विश्वास आहे की, डॉग्ज आपल्याला उत्तम माणूस बनवतात. सर्व डॉग्जप्रेमींना इंटरनॅशनल डॉग डेच्या आनंदमय शुभेच्छा.”