Home क्राईम अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

1 second read
0
0
262

no images were found

अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

नागपूर : कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यास मारहाण केल्या प्रकरणात सावनेरचे तत्कालीन आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांना जिल्हा न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली.

महापारेषणतर्फे कोराडी-तिडंगीदरम्यान अति उच्चदाब वीजवाहिनी टाकण्याचे काम ६ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरू होते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीही अधिग्रहित करण्यात आल्या. वाहिनीसाठी येथे मोठमोठे मनोरे उभारण्यात आले. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी महापारेषणचे सहाय्यक अभियंता अमोल खुबाळकर हे दोन-तीन अधिकाऱ्यांसह तेलगाव येथे शेतकऱ्यांशी त्यांच्या पिकहानीच्या भरपाईसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी गेले. सोबत येथील कंत्राटदार मेसर्स बजाज कंपनीचा एक अधिकारीही होता. अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच आमदार सुनील केदार त्यांच्या सुमारे २० सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले.
महापारेषणला येथे काम सुरू करण्याची परवानगी दिली कुणी, हा प्रश्न विचारून त्यांच्यासह इतर चौघांनी थुबाळकर व कंत्राटदाराच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करून अचानक मारहाण सुरू केली. पुन्हा या भागात काम करताना दिसल्यास तुमचे तुकडे करून घरी पाठवू, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप सुनील केदार यांच्यावर होता.
या प्रकरणात सावनेर पोलिसांनी सुनील केदार यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. सर्व साक्षीदार व पुरावे तपासत न्यायालयाने माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षांची शिक्षा सुनावली. शासनातर्फे ऍड. अजय माहुरकर यांनी बाजू मांडली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी द्यावा, खासदार धनंजय महाडिक यांचं केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी.आर.पाटील यांना निवेदन

  जलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी…