Home सामाजिक उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

2 second read
0
0
471

no images were found

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

अधिक्षक अभियंता मा.श्री.अंकुर कावळे
 
कोल्हापूर : औद्योगिक ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीज पुरवठा मिळावा या भुमिकेतून महावितरण व उद्योजक यांच्यात सातत्यपुर्ण संवाद सुरू आहे. गत मे महिन्यातील बैठकीनंतर महावितरण व मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले यांचे शिष्टमंडळासमवेत नुकतीच पाठपुरावा बैठक झाली. यावेळी उद्योगांसाठी वीज सुविधांचे बळकटीकरण करणे आणि उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यासाठी महावितरण कटीबध्द असल्याचे अधिक्षक अभियंता मा.श्री.अंकुर कावळे यांनी सांगितले.
               कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वासाहतीत महापारेषण कंपनीच्या उपकेंद्रातील रोहित्राची 50 एमव्हीए ते 100 एमव्हीए क्षमतावाढीचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पुर्ण होणार आहे, त्याबद्दल मॅकने समाधान व्यक्त केले आहे. महावितरणचे स्वतंत्र कार्यालयाच्या प्रस्तावाबाबत श्री.कावळे यांनी स्पष्ट केले की,  कागल-हातकणंगले औद्योगिक वसाहतीमधील ग्राहकसंख्या लक्षात घेता ते प्रशासकीयदृष्ट्या सोईचे नाही. मात्र आठवड्यातील एक दिवस संबंधित शाखा अभियंता यांना तेथील उपकेंद्रात उपस्थित रहावे असे निर्देशित केले आहे.या निर्णयाचे उद्योजकांनी स्वागत केले आहे. महावितरणचा सर्व कारभार डिजिटल पध्दतीने झाला असल्याने बहुतांश कामे ऑनलाईनव्दारे करण्याची सोय उद्योजकांना असल्याचे श्री.कावळे यांनी सांगितले. 
               डी व जी ब्लॉकमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडितची समस्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केली. त्यासंदर्भात कार्यकारी अभियंता श्री. सुनिल शिंदे यांनी सांगितले की, मे व जुन महिन्यात वादळी वारा व पाऊस या नैसर्गिक कारणास्तव वीजपुरवठा खंडितची समस्या उद्भवली. डी व जी ब्लॉकमध्ये स्वतंत्र कर्मचारी वृंद व वाहन उपलब्ध असल्याने तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. वारंवार वीज खंडित होऊ नये, यासाठी उर्वरीत देखभाल व दुरूस्तीची कामे करून घेण्यात येतील. ए,बी,सी,डी व जी ब्लॉक करीता नवीन 33/11 विद्युत उपकेद्रांकरीता एमआयडीसीकडून मिळालेल्या भूखंडाची नोंदणी प्रक्रिया सुरू असून जुलैअखेर तो भुखंड महावितरण ताब्यात घेईल,अशी माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य) श्री. प्रवीणकुमार थोरात यांनी बैठकीत दिली. तसेच आयत्यावेळच्या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.  
            या बैठकीस मॅकचे अध्यक्ष श्री.संजय पेंडसे, उपाध्यक्ष श्री.यशवंत पाटील, सचिव श्री. शंतनू गायकवाड, उपविभागीय अभियंता श्री.विनोद घोलप, सहाय्यक अभियंता विना मटकर, श्री.महेश पाटील यांच्यासह उद्योजक व मॅक पदाधिकारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शेतकऱ्यांच्या हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ

शेतकऱ्यांच्या हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ   मुंबई, :  सततची नापिकी, लहरी…