
no images were found
वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले
वेल्हा- बळीराम आधवडे यांचं वेल्ह्यातील शिरगांव येथे रेशनिंग दुकानं आहे. शिरगावात पुण्यातल्या वेल्हा तालुक्यात रेशनिंग दुकानं फोडून चोरटयांनी 125 पोती गहू लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत रेशन दुकानंदार यांनी वेल्हा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. घटनेच्या वेळी अंधारात चोरटयांनी दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या भिंतीच्या विटा काढून खिडकी बनवली. या खिडकीतून जवळपास गव्हाची 125 पोती चोरी केली आहेत.. चोरीच्या घटनेच्या दिवशी चोरांनी दुकान असलेल्या भिंतीला चोरट्याने मागील बाजूने बोगदा पडला. त्यानंतर रेशन दुकानातील धान्याची थोडी थोडकी नव्हे तब्बल गव्हाची 125 पोती लंपास केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेनंतर पोलिस घटना स्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपासास सुरुवात केली आहे. दुकानामध्ये इतर वस्तूदेखील होत्या, मात्र खिडकीचा आकार छोटा असल्यानं इतर वस्तू चोरट्यांना चोरता आल्या नाहीत. अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. वेल्हा पोलीस स्टेशनंचे कर्मचारी अधिक तपास करत आहेत.