
no images were found
कसबा बावडा लाईन बाजार येथील घनकचरा प्रक्रीया प्रकल्पावरील लोखंडी भंगार चोरी प्रकरणी कारवाई
कोल्हापूर (प्रतिनिधी):- कसबा बावडा लाईन बाजार येथील महानगरपालिकेच्या घनकचरा प्रक्रीया प्रकल्पावरील लोखंडी भंगार चोरी प्रकरणी ठोक मानधनावरील आरोग्य निरीक्षक सुशांत मुरलीधर कवडे याला महापालिकेच्या आरोग्य सेवेतून कमी करण्यात आले आहे. तर झाडू कामगार तथा मुकादम दादासो जयवंत लोंढे याला महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज केली.
ठोक मानधन तत्वावरील आरोग्य निरिक्षक सुशांत मुरलीधर कावडे यांना क. बावडा येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील दैनंदिन कामकाजाचे नियोजन व नियंत्रण देण्यात आले होते. या परिसरातील महानगरपालिकेच्या मालमत्तेचे संरक्षण व जतन करणेची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली होती. या विकाणचे काही लोखंडी भंगार चोरीला गेलेबाबत काही दिवसापुर्वी प्रशासनाकडे तक्रार प्राप्त झालेली होती. यानंतर दि.२० मार्च २०२५ रोजी सहा.आयुक्त कृष्णा पाटी व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील यांनी सदर ठिकाणाची पाहणी केली. यावेळी त्यांना या ठिकाणचे काही भंगार साहित्य चोरुन नेलेचे दिसून आले. यानंतर सुशांत मुरलीधर कावडे यांना कारणे दाखवा नोटीसीने याबाबत विचारणा केली असता त्याने याबाबत काही माहित नसलेचा लेखी खुलासा सादर केला. सदर प्रकरणी प्रकल्प स्थळावरील पोकलेन ऑपरेटर, स्क्रैप खरेदी-विक्री करणारी व्यक्ती व खाजगी ठेकेदारीकडील ट्रॅक्टर ट्रॉलीचालक यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचा खुलासा मागणी केला असता पोकलेन ऑपरेटर, स्क्रैप खरेदी-विक्री करणारी व्यक्ती तसेच खाजगी ठेकेदारीकडील ट्रॅक्टर ट्रॉलीचालक यांनी सुशांत मुरलीधर कवडे यांचे सांगणेवरुन सदरचे भंगार दोन वेळेस विक्री केलेचा लेखी खुलासा दिलेला आहे. पोकलेन ऑपरेटर, स्क्रैप खरेदी-विक्री करणारी व्यक्ती तसेच खाजगी ठेकेदारीकडील ट्रॅक्टर ट्रॉलीचालक यांचे जाब जबाबा बरुन ठोक मानधनावरील आरोग्य निरीक्षक सुशांत मुरलीधर कवडे यांनी सदरचे भंगार विक्री केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना महानगरपालिकेच्या सेवेतून कमी करण्या आले आहे.
तसेच कोल्हापूर महानगरपालिकेकडील घनकचरा प्रक्रीया प्रकल्पावरील झाडू कामगार तथा मुकादम दादासो जयवंत लोंढे कार्यरत होते. या ठिकाणच्या कामकाजाचे नियोजन व नियंत्रण ठेवणे व महानगरपालिकेच्या मालमत्तेचे संरक्षण व जतन करणेची जबाबदारी त्यांच्यावरही सोपविण्यात आलेली होती. परंतु या प्रकरणी प्रकल्प स्थळावरील पोकलेन ऑपरेटर, स्क्रैप खरेदी-विक्री करणारी व्यक्ती तसेच खाजगी ठेकेदारीकडील ट्रॅक्टर ट्रॉलीचालक यांनी दिले जबाबामध्ये झाडू कामगार तथा मुकादम दादासो जयवंत लोंढे यांनी दोन वेळेस स्वत: त्यांचेसोबत जाऊन भंगार विक्री केलेचे निदर्शनास आले. त्याचबरोबर भंगार विकल्यानंतर त्याचे पैसे दादासो जयवंत लोंढे यांनी स्वत: स्विकारल्याचे जबाबात नमुद केले आहे. त्यामुळे झाडू कामगार तथा मुकादम दादासो जयवंत लोंढे हे दोषी असल्याचे निदर्शनास आलेने त्याला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६ मधील पोटकलम (२) (फ) नुसार महानगरपालिकेच्या सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांचेविरुध्द विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.