Home निवड अदाणी ग्रुपची युनेस्कोच्या वर्ल्ड इंजिनीअरिंग डे 2026 साठी अधिकृत भागीदार म्हणून निवड

अदाणी ग्रुपची युनेस्कोच्या वर्ल्ड इंजिनीअरिंग डे 2026 साठी अधिकृत भागीदार म्हणून निवड

4 second read
0
0
7

no images were found

अदाणी ग्रुपची युनेस्कोच्या वर्ल्ड इंजिनीअरिंग डे 2026 साठी अधिकृत भागीदार म्हणून निवड

अहमदाबाद, : भारतातील सर्वात मोठ्या ट्रांसपोर्ट, युटिलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर असलेल्या अदाणी ग्रुपला ‘वर्ल्ड इंजिनीअरिंग डे फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (डब्लूईडी) 2026’ साठी अधिकृत भागीदार म्हणून निवडण्यात आले आहे. हा एक आंतरराष्ट्रीय दिवस आहे, जो युनेस्को (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन) द्वारे साजरा केला जातो आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ इंजिनीअरिंग ऑर्गनायझेशन्स (डब्ल्यूएफईओ) द्वारे आयोजित केला जातो.

अदाणी ग्रुपला मिळालेला हा मान त्याच्या स्वच्छ उर्जा क्षेत्रातील नेतृत्व आणि मोठ्या प्रमाणावर स्वच्छ, विश्वासार्ह आणि परवडणारी वीज पुरवण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे. हे भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मदत करते आणि जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी 7) साध्य करण्यास योगदान देते.

या मान्यतेवर प्रतिक्रिया देताना,सागर अदाणी,कार्यकारी संचालक,अदाणी ग्रीन एनर्जी यांनी सांगितले,
“आम्ही हे दाखवून देत आहोत की स्वच्छ ऊर्जा मोठ्या प्रमाणावर असूनही परवडणारी असू शकते, शक्तिशाली असूनही सर्वांसाठी उपलब्ध राहू शकते. हे जगासाठी भारताचे योगदान आहे—जिथे प्रगती आणि टिकाऊपणा एकत्र पुढे जातात. आमचे खावडा रिन्यूएबल एनर्जी प्लांट भारताच्या हवामान क्रियाशीलतेचे प्रतीक आहे. हे अदाणी ग्रीन एनर्जी, अदाणी एनर्जी सोल्यूशन्स आणि अदाणी न्यू इंडस्ट्रीज यांच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक आहे, जे एकत्र येऊन एक एकात्मिक नूतनीकरणीय भविष्य घडवत आहेत.”

‘वर्ल्ड इंजिनीअरिंग डे फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (डब्लूईडी) 2026 ची थीम आहे “नवोपक्रम आणि डिजिटलीकरणाद्वारे शाश्वत भविष्यासाठी स्मार्ट इंजिनीअरिंग.” अदाणी ग्रुपचे नूतनीकरणीय ऊर्जा, डिजिटल पायाभूत सुविधा, आणि मोठ्या प्रमाणावर वाहतूक व युटिलिटी सिस्टम्सवरील काम या दृष्टिकोनाशी अगदी जुळते. हे दाखवते की तंत्रज्ञानावर आधारित इंजिनीअरिंग कशी प्रत्यक्ष परिस्थितीत टिकाऊ विकास साधू शकते.

या सहकार्याचा केंद्रबिंदू गुजरातमधील खावडा रिन्यूएबल एनर्जी प्रकल्प आहे, जो जगातील सर्वात मोठा प्रकल्प असून 2029 पर्यंत 30 जीडब्ल्यू क्षमतेसाठी तयार होणारआहे. डब्ल्यूएफईओ ने हा प्रकल्प भारताच्या हरित ऊर्जा संक्रमणाचे महत्त्वाचे उदाहरण म्हणून वर्ल्ड इंजिनीअरिंग डे 2026 कार्यक्रमात सादर केला आहे. या प्रकल्पाचे प्रमाण, महत्वाकांक्षा आणि परिणाम दाखवणारा एक लघुचित्रपटही बनवण्यात आला आहे.

अदाणी ग्रुपच्या वर्ल्ड इंजिनीअरिंग डे 2026 कार्यक्रम संदर्भातील माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा: Adani Group – WFEO World Engineering Day 2026

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निवड
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…