Home क्राईम बिकिनीवर ऑडिशन द्यायला लावून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; पुण्यातील उद्योजकावर गुन्हा

बिकिनीवर ऑडिशन द्यायला लावून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; पुण्यातील उद्योजकावर गुन्हा

2 second read
0
0
312

no images were found

बिकिनीवर ऑडिशन द्यायला लावून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; पुण्यातील उद्योजकावर गुन्हा

पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील एका नामांकित उद्योजकाने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच, आरोपी उद्योजक हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. राजेंद्र दगडु गायकवाड असं, या उद्योजकाचं नाव आहे.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी राजेंद्र हा त्यांच्या घरी आला होता. यावेळी त्याने पीडित मुलीला फिल्म इंडस्ट्रीज मध्ये काम देण्याचं अमिष दाखवलं. त्यानंतर आरोपीने ऑडिशन घेत असल्याचं कारण देत, पीडितेच्या आई-वडीलांना घरातून बाहेर पाठवलं. आरोपीने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला कपडे उतरवायला लावले. पीडित मुलीने कपडे उतरवताच, आरोपीने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. अत्याचारानंतर आरोपी राजेंद्र हा तेथून तातडीने निघून गेला. या सर्व प्रकारानंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने आपल्यावर अत्याचार झाल्याचं आई-वडीलांना सांगितलं. मुलीवर अत्याचार झाल्याचं लक्षात येताच, पीडितेच्या आई-वडीलांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठलं. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी राजेंद्र दगडु गायकवाड याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच, आरोपी राजेंद्र हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींवरही अत्याचार झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अशीच घटना पुण्यातून समोर आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी द्यावा, खासदार धनंजय महाडिक यांचं केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी.आर.पाटील यांना निवेदन

  जलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी…