no images were found
आकाश मुळे प्रकरणात रविकिरण इंगवलेच्या सहभागाची चौकशी करा; शिवसेनेची जुना राजवाडा पोलिसांकडे मागणी
कोल्हापूर, : दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी आकाश चंद्रकांत मुळे, रा. जुना बुधवार पेठ, कोल्हापूर यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ०५४४/२०२६ अन्वये फारुख खान, विक्रम पाटील, देव्या सूर्यवंशी व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील घटना गंभीर असून, फिर्यादीवर मारहाण करून त्याच्याकडून पैसे/खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. या घटनेमध्ये रविकिरण इंगवले याचा सहभाग असल्याचे फिर्यादीच्या कथनातून समोर येत असल्याचा दावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. फिर्यादीच्या कथनात जर रविकिरण इंगवले याचा सहभाग अथवा त्याच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती नमूद झाली असेल, तर त्याचा तपासामध्ये गांभीर्याने विचार का करण्यात आला नाही, याबाबत पोलिस प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी शिवसेनेने जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केली आहे.
फक्त गुन्ह्यात नोंद झालेल्या आरोपींपुरता तपास मर्यादित न ठेवता, या घटनेमागील कथित सूत्रधार, नियोजन, आर्थिक व्यवहार, आरोपींमधील संपर्क आणि घटनेतील प्रत्यक्ष सहभाग यांचा तपास करण्यात यावा. यासाठी आकाश मुळे यांचा सविस्तर पूरक जबाब नोंदवून आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हनी-ट्रॅप व खंडणीच्या आरोपांचीही चौकशी करा
फारुख खान याच्याविरुद्ध हनी-ट्रॅपच्या माध्यमातून नागरिकांना फसवून खंडणी उकळल्याचे आरोप असल्याची माहिती शिवसेनेच्या निदर्शनास आली आहे कोल्हापूर जिल्ह्यात नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला आळा बसणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित पीडित नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांकडे तक्रारी द्याव्यात, असे आवाहन जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केले आहे.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या
पोलीस प्रशासनाने गुन्हा रजि. नं. ०५४४/२०२६ चा सखोल व निष्पक्ष तपास करावा. आकाश मुळे यांचा पूरक जबाब नोंदवून रविकिरण इंगवले याच्या सहभागाची चौकशी करावी. तपासात सहभाग निष्पन्न झाल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करावी. फारुख खान याच्याविरुद्ध करण्यात येत असलेल्या हनी-ट्रॅप व खंडणीच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करावी. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय अथवा अन्य दबाव न ठेवता निष्पक्ष तपास करावा. “पीडिताला न्याय आणि दोषीला कायद्यानुसार शिक्षा” या भूमिकेवर शिवसेना ठाम असून, या प्रकरणाच्या तपासात कोणतीही दिरंगाई अथवा दुर्लक्ष झाल्यास शिवसेना स्वस्थ बसणार नाही.
त्रस्त नागरिकांनी निर्भीडपणे पुढे येऊन तक्रारी दाखल कराव्यात
कोल्हापूर जिल्ह्यात नागरिकांची फसवणूक, धमकी, मारहाण, खंडणी अथवा इतर कोणत्याही प्रकारे त्रास झाल्याच्या घटना असतील, तर संबंधित नागरिकांनी घाबरून न जाता पुढे यावे. अशा घटनांबाबत पोलीस प्रशासनाकडे तसेच शिवसेनेकडे लेखी तक्रारी व उपलब्ध पुरावे सादर करावेत, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. एखाद्या नागरिकास अशा प्रकारे फसवणूक, धमकी, खंडणी अथवा मारहाणीचा त्रास झाला असल्यास त्याने आपली तक्रार दडपून न ठेवता कायदेशीर मार्गाने पुढे आणावी. कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी “भीती बाळगू नका, पुढे या आणि तक्रार दाखल करा”, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजित जाधव, दीपक चव्हाण, किशोर घाटगे, सुरेश माने, उमेश जाधव, क्रांतिकुमार पाटील,राजू पाटील, निलेश गायकवाड, रोहन उलपे, रणजित मंडलिक, सचिन राऊत, सोमनाथ सुतार,