no images were found
“शॉन आणि शनाया या दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये सतत बदल करत अभिनय करणे काही वेळा आव्हानात्मक ठरायचे,” : मुस्कान बामणे
सोनी सबची पुष्पा इम्पॉसिबल मालिका आपल्या रंजक कौटुंबिक नाट्य, अनपेक्षित खुलासे आणि बदलत्या नातेसंबंधांमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. मालिकेत आता एक भावनिक वळण येणार आहे, कारण बापोद्रा (जायेश भरभाया) यांना अखेर शनाया (मुस्कान बामणे) ही प्रत्यक्षात शॉन असल्याचे समजते. हा खुलासा त्याच दिवशी होतो, ज्या दिवशी बापोद्रांना आमदारकीचे तिकीट मिळते आणि टायगर (मुकुल हरीश) त्यांना शनायाची खरी ओळख सांगण्याचा निर्णय घेतो. टायगरला शनाया आणि तिच्या प्रवासाचा अभिमान असला तरी हा खुलासा बापोद्रांना धक्का देणारा आणि त्यांना अस्वस्थ करणारा ठरतो. सत्य स्वीकारणे कठीण गेल्याने बापोद्रा आपल्याला आता आमदारकीचे तिकीट नको असल्याचा निर्णय घेतात.
शनाया आपल्या बाजूची कहाणी समजावून सांगण्याचा आणि बापोद्रांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असताना, टायगरने तिची परवानगी न घेता तिची खरी ओळख उघड केल्यामुळे ती त्याच्यासमोर नाराजी व्यक्त करते. टायगरचा हेतू चांगला असावा हे तिला समजत असले, तरी तिच्यावर आणि बापोद्रांसोबतच्या तिच्या नात्यावर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार न करता त्याने तिच्यावतीने इतका महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे ती दुखावलेली असते. बापोद्रा ही परिस्थिती स्वीकारण्यास नकार देत आमदारकीचे तिकीट सोडण्याचा निर्णय घेतात, त्यामुळे शनाया एका कठीण द्विधा मनःस्थितीत अडकते. एकीकडे तिला बापोद्रांनी तिचे निर्णय समजून घ्यावेत असे वाटते, तर दुसरीकडे त्यांना आणखी दुखवायचे नसते. परिस्थिती अधिक सोपी व्हावी या विचाराने ती चाळ सोडण्याचाही विचार करते, कारण तिच्या अनुपस्थितीमुळे बापोद्रांसाठी गोष्टी कदाचित अधिक सोप्या होतील असे तिला वाटते. मात्र, हा निर्णय शनायासाठी आणखी एक भावनिक आव्हान ठरू शकतो, कारण तिने नेहमीच त्या चाळीला आपले घर मानले आहे.
शनाया बापोद्रांसोबतचे नाते सुधारण्यासाठी चाळ सोडून जाण्याचा निर्णय घेईल का?
आगामी कथानकाबद्दल बोलताना मुस्कान बामणे म्हणाली, ““शॉन आणि शनाया या दोन्ही व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी खूपच आनंददायी अनुभव होता आणि आता सर्वांना शॉन म्हणजेच शनाया आहे हे समजल्यामुळे शॉनची भूमिका साकारण्याची मला नक्कीच उणीव भासेल. या दोन्ही व्यक्तिरेखांचे स्वभाव, देहबोली आणि स्वतःला व्यक्त करण्याच्या पद्धती पूर्णपणे वेगळ्या होत्या. प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी तयारी करणे हा स्वतःमध्ये एक वेगळाच अनुभव होता. चित्रीकरणादरम्यान या दोन व्यक्तिरेखांमध्ये सतत बदल करत अभिनय करणे काही वेळा आव्हानात्मक ठरायचे, पण त्यामुळे हा अनुभव आणखी रोमांचक झाला. या दोन्ही व्यक्तिरेखांच्या वेगवेगळ्या बाजू शोधताना आणि पडद्यावर त्यांतील फरक प्रभावीपणे साकारताना मला खूप आनंद मिळाला.”