Home मनोरंजन फॅमिली ड्रामा, विनोद आणि अनपेक्षित वळणांची धमाल घेऊन येणारा ‘अफरातफरी’ 13 नोव्हेंबरपासून मराठी झी5वर

फॅमिली ड्रामा, विनोद आणि अनपेक्षित वळणांची धमाल घेऊन येणारा ‘अफरातफरी’ 13 नोव्हेंबरपासून मराठी झी5वर

4 second read
0
0
6

no images were found

फॅमिली ड्रामा, विनोद आणि अनपेक्षित वळणांची धमाल घेऊन येणारा ‘अफरातफरी’ 13 नोव्हेंबरपासून मराठी झी5वर

 ~ मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित आणि मोहन आगाशे, संजय नार्वेकर व ओंकार भोजने यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘अफरातफरी’ 13 नोव्हेंबर 2026 रोजी मराठी झी5वर प्रदर्शित होणार ~

      मराठी झी5वर ‘अफरातफरी’ हा फॅमिली-कॉमेडी ड्रामा प्रकारातील सिनेमा 13 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. तीन भावांच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या या कथेत वडिलांच्या निधनानंतर एकामागोमाग एक विचित्र घटना घडू लागतात. वडिलांच्या विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर तिन्ही भावांच्या वेगवेगळ्या आर्थिक गरजा आणि महत्त्वाकांक्षांमुळे अनेक विनोदी प्रसंग, अनपेक्षित वळणे आणि कौटुंबिक गुंतागुंत निर्माण होते. या सिनेमाचे दिग्दर्शन मिलिंद झुंबर कवडे यांनी केले आहे.’स्कायलाइन सिनेमॅटिक’ आणि ‘येन मूव्ही स्टुडिओज’ प्रस्तुत, ‘आउट ऑफ द बॉक्स फिल्म्स’च्या सहयोगाने तयार झालेल्या या सिनेमात मोहन आगाशे, संजय नार्वेकर, शशांक शेंडे, ओंकार भोजने, आसावरी जोशी, प्राजक्ता हणमघर, किरण माने, नेहा खान आणि हेमंत पाटील यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत.

 ‘अफरातफरी’ ही आर्थिक अडचणीत सापडलेल्या तीन भावांची कथा आहे. प्रत्येकाची स्वतःची काही स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा आहेत. आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तिघेही मार्ग शोधत असतात. अशातच वडिलांच्या विम्यापोटी मोठी रक्कम मिळू शकते, हे त्यांना समजते. पैशांची निकड असल्यामुळे तिघेही काही संशयास्पद योजना आखू लागतात आणि त्यातून अनपेक्षित घटना घडू लागतात.आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नातून सुरू झालेली या कथेत हळुहळू गोंधळ, गैरसमज आणि विनोदी प्रसंग घडू लागतात. तिघांच्या योजना अनपेक्षित वळणे घेत असताना कौटुंबिक नात्यांचीही कसोटी लागते. मनात दडलेले मतभेद उफाळून येतात आणि नात्यांमधील समीकरणे बदलू लागतात. प्रसंगनिष्ठ विनोद, नाट्य आणि भावनांची सांगड घालणारा हा सिनेमा अखेरीस एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतो. पैसा सर्वाधिक महत्त्वाचा ठरू लागतो, तेव्हा कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या नात्यांचे काय होते?

‘अफरातफरी’ या सिनेमात तीन भावांच्या वडिलांचे निधन आणि त्यानंतर मिळणारी विम्याची रक्कम यातून मुख्य संघर्षाला सुरुवात होते. खरे तर हा संपूर्ण कुटुंबासाठी दुःखाचा प्रसंग असतो. मात्र, तिन्ही भावांचे आर्थिक हितसंबंध आणि वैयक्तिक हेतू यामुळे घटनांना अनपेक्षित वळण मिळते. त्यातून एकामागोमाग एक घटना घडत जातात आणि सिनेमाची कथा पुढे सरकते.पैसा केंद्रस्थानी असलेल्या एका वेगळ्याच परिस्थितीभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे. पैशांसाठी घेतलेले संशयास्पद निर्णय, त्यातून निर्माण होणारी अनपेक्षित गुंतागुंत आणि विनोदी प्रसंग यामुळे कथेला रंगत येते. पुढे आणखी काय घडणार आणि कोणती नवीन अडचण निर्माण होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना सतत लागून राहते.

वेगवेगळ्या गरजा आणि महत्त्वाकांक्षा असलेल्या तीन भावांमधील नातेसंबंध हा या सिनेमाच्या कथेचा गाभा आहे. पैसा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे त्यांच्यात मतभेद निर्माण होतात. वैयक्तिक स्वार्थाला प्राधान्य दिले जाते, तेव्हा कौटुंबिक नातेसंबंध किती गुंतागुंतीचे होतात, हे या कथेतून समोर येते.या सिनेमातील विनोद केवळ विनोदी संवादांवर अवलंबून नाही. वेगवेगळ्या प्रसंगांना व्यक्तिरेखांकडून मिळणारा प्रतिसाद, कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांची धडपड आणि त्यातून निर्माण होणारे गैरसमज यांमधून विनोदाची निर्मिती होते. त्यामुळे हे प्रसंग प्रेक्षकांना आपल्या दैनंदिन जीवनातील घटनांशी जोडलेले वाटतात. त्याचबरोबर कथेमधील नाट्यही स्वाभाविकपणे उलगडत जाते.

‘अफरातफरी’ या सिनेमात मराठीतील अनेक दमदार कलाकार एकत्र आले आहेत. मोहन आगाशे, संजय नार्वेकर आणि शशांक शेंडे यांसारख्या अनुभवी कलाकारांसोबत ओंकार भोजने, आसावरी जोशी, प्राजक्ता हणमघर आणि इतर कलाकारांचाही समावेश आहे. या विविध कलाकारांच्या अभिनयामुळे व्यक्तिरेखांचे वेगवेगळे पैलू प्रभावीपणे समोर येतात आणि कथेला अधिक खोली मिळते.विनोद आणि गोंधळाच्या पलीकडे जाऊन ‘अफरातफरी’मध्ये लोभ, आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक स्वार्थ यांचा कौटुंबिक नात्यांवर कसा परिणाम होतो, याचा वेध घेण्यात आला आहे. आयुष्यात सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या नात्यांमध्येच पैशांच्या हव्यासामुळे कशी गुंतागुंत निर्माण होऊ शकते, हे या सिनेमातून अधोरेखित होते.

ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे म्हणाले, “विनोद आणि नाट्याच्या माध्यमातून मानवी स्वभावातील अनपेक्षित पैलू समोर आणणारी ‘अफरातफरी’ ही मनोरंजक कथा आहे. पैशांची गरज माणसाला कशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत अडकवू शकते, हे या सिनेमातून दाखवण्यात आले आहे. .”

अभिनेते शशांक शेंडे म्हणाले, “‘अफरातफरी’मध्ये काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी खरोखरच आनंददायी होता. एक अभिनेता म्हणून आणि इतक्या उत्तम कलाकारांच्या टीमचा भाग म्हणूनही हा अनुभव विशेष ठरला. या सिनेमाची कथा वेगळ्या आणि प्रेक्षकांना आपलीशी वाटेल अशा विषयाभोवती फिरते. पैशांमुळे माणसांच्या स्वभावातील अनपेक्षित पैलू समोर येतात आणि त्यातून प्रचंड गोंधळ उडवणारे, खळखळून हसवणारे प्रसंग निर्माण होतात. ”

अभिनेते संजय नार्वेकर म्हणाले, “‘अफरातफरी’सारख्या विनोदी सिनेमाची खरी गंमत म्हणजे एका प्रसंगातून दुसरा प्रसंग घडत जातो आणि व्यक्तिरेखा आपल्या अपेक्षेपेक्षाही मोठ्या संकटात अडकत जातात. या सिनेमात अनेक धमाल विनोदी प्रसंग आहेत. आजुबाजूला सुरू असलेल्या गोंधळाला प्रत्येक व्यक्तिरेखा कसा प्रतिसाद देते, यातूनच खरी मजा निर्माण होते. विनोदामध्ये अचूक टायमिंग आणि कलाकारांमधील उत्तम ताळमेळही खूप महत्त्वाचा असतो. आमची टीम अतिशय चांगली असल्यामुळे काम करतानाही खूप मजा आली. हा सिनेमा बनवताना आम्ही जितकी धमाल केली, तितकीच धमाल प्रेक्षकांनाही तो पाहताना अनुभवायला मिळेल, अशी मला आशा आहे.”

अभिनेते ओंकार भोजने म्हणाले, “एक अभिनेता म्हणून व्यक्तिरेखेच्या विविध पैलूंचा वेध घेण्याची संधी देणाऱ्या कथांमध्ये काम करायला मला आवडते. ‘अफरातफरी’मध्ये अशी भरपूर संधी मिळाली. या सिनेमाच्या पटकथेत अनेक रंजक व्यक्तिरेखा आहेत. त्यांनी घेतलेले निर्णय आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या हेतूंमुळे कथा सतत अनपेक्षित वळणे घेत पुढे सरकते. ”

दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे म्हणाले, “‘अफरातफरी’च्या माध्यमातून मला एका वेगळ्या कौटुंबिक परिस्थितीभोवती कथा गुंफायची होती. पैशांची मोठी रक्कम मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यावर अगदी जवळच्या नात्यांमधील समीकरणे कशी बदलू शकतात, याचा वेध घ्यायचा होता. वडिलांचे निधन आणि त्यानंतर मिळणारी विम्याची रक्कम हा या कथेचा आरंभबिंदू आहे. त्यानंतर घडणाऱ्या घटनांमधून तिन्ही भावांचे परस्परविरोधी हितसंबंध, मनातील असुरक्षितता आणि त्यांच्या वागण्यामागील वेगवेगळे हेतू समोर येतात. ”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

पाच लाख रुपयांची वैयक्तिक भेट नाकारून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचा गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात; दोन आठवड्यांत सात ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

पाच लाख रुपयांची वैयक्तिक भेट नाकारून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचा गरजू रुग्णांसाठी मदतीचा हा…