no images were found
कलाकारांनी खाद्यपदार्थ, धमाल आणि एकत्र येण्याच्या आनंदासह साजरा केला सण
मुंबई, : सोनी सबचा पुष्पा इम्पॉसिबल हा शो पुष्पा (करुणा पांडे) हिच्या कौटुंबिक आयुष्यातील चढ-उतार, नातेसंबंध आणि अनपेक्षित आव्हानांमधील प्रवासाची कहाणी पुढे नेत आहे. टायगर (मुकुल हरीश) हा पुष्पाचा जैविक मुलगा असल्याचे सर्वांना समजल्यानंतर, चिराग (नितीन बाबू) आणि टायगर यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे.
मात्र पडद्यावर पुष्पाच्या आयुष्यात अनेक समस्या सुरू असतानाच, पडद्यामागे कलाकारांनी सेटवर एकत्र येत दिवाळी साजरी केली. सणासुदीचे पोशाख, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि भरपूर धमाल यामुळे हा उत्सव अधिक खास बनला. कलाकारांसाठी हा उत्सव म्हणजे कामातून मिळालेला एक आनंददायी विरंगुळा आणि एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी होती. करुणा पांडे, मुकुल हरीश आणि मुस्कान बामणे यांनी दिवाळी एकत्र साजरी करण्यातील त्यांचा आवडता भाग शेअर केला.
पुष्पाची भूमिका साकारणाऱ्या करुणा पांडे यांनी सांगितले, “दिवाळीमधला माझा सर्वात आवडता भाग म्हणजे माझ्या आजूबाजूचा परिसर सजवणं. त्यामुळे घर असो किंवा सेट, खूप सकारात्मकता आणि उबदारपणा निर्माण होतो असं मला वाटतं. आम्ही खूप सारे दिवे लावले आणि मी एक सुंदर रांगोळीही काढली. सणासुदीच्या या छोट्या–छोट्या परंपरांचा मला खूप आनंद मिळतो आणि त्यामुळे सेलिब्रेशन आणखी खास वाटतं.”
टायगरची भूमिका साकारणाऱ्या मुकुल हरीश यांनी सांगितले, “सेटवर दिवाळी साजरी करण्याचा सर्वात खास भाग म्हणजे नक्कीच खाद्यपदार्थ होते. तिथे मिठाईचे खूप प्रकार होते आणि मी जवळपास सगळ्यांचाच आस्वाद घेतला. दिवाळीच्या काळात मिठायांपासून दूर राहणं खूप कठीण असतं, विशेषतः जेव्हा तुमच्या आजूबाजूला इतक्या मिठाया असतात. आम्ही सगळ्यांनी एकत्र सण साजरा करत, पदार्थांची देवाणघेवाण करत आणि सणाच्या उत्साहाचा आनंद घेत खूप छान वेळ घालवला. सेटवरचा तो खरोखरच खूप मजेदार दिवस होता.”
शनायाची भूमिका साकारणाऱ्या मुस्कान बामणे यांनी सांगितले, “मला सणांसाठी छान तयार व्हायला खूप आवडतं, त्यामुळे सेटवरील दिवाळी माझ्यासाठी खूपच उत्साहवर्धक होती. सगळेच खूप सुंदर तयार झाले होते आणि संपूर्ण सेटवर सणाचा अतिशय आनंदी माहोल होता. आम्ही सगळेजण एकत्र आलो, फोटो काढले, खूप स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला आणि एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा आनंद लुटला. जणू एखादं मोठं कुटुंब एकत्र येऊन दिवाळी साजरी करत आहे, असंच वाटत होतं आणि मी त्या दिवसाचा मनापासून आनंद घेतला.”