Home शैक्षणिक विद्यार्थ्यांनी आंतरविध्याशाखीय ज्ञान आत्मसात करावे : प्रा. डॉ. के. डी. सोनवणे

विद्यार्थ्यांनी आंतरविध्याशाखीय ज्ञान आत्मसात करावे : प्रा. डॉ. के. डी. सोनवणे

0 second read
0
0
64

no images were found

विद्यार्थ्यांनी आंतरविध्याशाखीय ज्ञान आत्मसात करावे : प्रा. डॉ. के. डी. सोनवणे

कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र अधिविभागाने आयोजित एम.एस्सी. भाग १ (२०२४-२०२५) चा स्वागत समारंभ उत्साहाने संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाली. कार्यक्रमात सुरवातीस कोमल घुटुकडे, वैष्णवी यादव, सुप्रिया पाटील व तुषार सुतार या विद्यार्थ्यांनी त्यांचे अधिविभागातील विविध प्रसंग तसेच त्यांना आलेले अनुभव मनोगतातून व्यक्त केले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. के. डी. सोनवणे, अधिविभागप्रमुख जीवरसायनशास्त्र अधिविभाग हे लाभले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सक्षता वाघमारे या विद्यार्थिनीने केला. डॉ. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना “भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांच्यातील गहन परस्परसंबंध सांगितले. जीवन प्रक्रिया समजून घेण्यासाठी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या मूलभूत भूमिकेवर भर दिला पाहिजे. क्वांटम बायोकेमिस्ट्रीचे महत्त्व आणि सेल्युलर फंक्शन्सवर त्याचा परिणाम यावर त्यांनी प्रकाश टाकला. आण्विक गतिशीलता आणि डीएनए संरचना यांसारख्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण शोधांची उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाच्या विशाल सीमांचा शोध घेण्यास प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांनी नेट, सेट आणि गेट सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी परिश्रमपूर्वक तयारी केली पाहिजे असे आवाहन केले. तसेच शिक्षण आणि परीक्षा, सोशल मीडियाचा प्रभाव, शिक्षकांची भूमिका आणि व्यक्तिमत्व विकास यांसारख्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात अधिविभागप्रमुख प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांबद्दल मार्गदर्शन केले. अधिविभागाची परंपरा, अधिविभागातील शिक्षकांचे योगदान, संशोधनातील विभागाचे स्थान या विषयांवर प्रकाश टाकला. तसेच शैक्षणिक उपक्रमांमध्ये वक्तशीरपणा, शिस्त आणि बहुविद्याशाखीय दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले. इलॉन मस्क सारख्या यशस्वी व्यक्तिमत्वापासून प्रेरणा घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांची क्षितिजे रुंदावण्याचे आणि सहकार्याची भावना जोपासण्याचे आवाहन केले. अदिती गुरव या विद्यार्थिनीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करून आभार मानले.
श्रुती खराडे आणि नेहा शहा या भौतिकशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचे कुशलतेने सूत्रसंचालन केले. याप्रसंगी, प्रा. डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. ए. व्ही. मोहोळकर, डॉ. आर. एस. व्हटकर, डॉ. एन. एल. तरवाळ, डॉ. एम. व्ही. टाकळे, डॉ. एस. पी. दास, डॉ. व्ही. एस. कुंभार, डॉ. ए. आर. पाटील, डॉ. एस. एस. पाटील यांच्यासह अधिविभागातील विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू मा. पी. एस. पाटील आणि कुलसचिव मा. व्ही. एन. शिंदे यांच्या पूर्ण पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळेच हे सर्व शक्य होत आहे असे भौतिकशास्त्र अधिविभागप्रमुख प्रा. आर. जी. सोनकवडे यांनी सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…