no images were found
डीकेटीईच्या टेक्स्टाईलच्या ११ विद्यार्थ्यांचे रिलायन्स या कंपनीमध्ये उत्तम पॅकेजसह निवड
इचलकरंजी (प्रतिनिधी): डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागातील ११ विद्यार्थ्यांची देशातील नामवंत रिलायन्स कंपनीमध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये डीकेटीईचे निवड झालेले विद्यार्थी विविध पदावर रुजू झाले आहेत.
रिलायन्स कंपनी टेक्स्टाईल आणि पॉलीस्टर उत्पादनात देशभरात अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. यावर्षी रिलायन्स इंडस्ट्रीमार्फत आयोजित रिटन टेस्ट, पर्सनल इंटरव्हयू अशा अनेक फे-यामधून विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमताची चाचणी घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांचे एकूणच शैक्षणिक गुणवत्ता यावरुन ११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. रिलायन्स कंपनीमध्ये निवड झालेले डीकेटीई टेक्स्टाईल चे विद्याथीर्र् – गौरव पाटील, रोहित पाटील, कौशल सोनवणे, मन्वेश गोरे, प्रतिक चौगुले, ॠतिक कंदुरकर, पार्श्व भांगडे, दर्शन मगदुम, श्री टकले, जितेंद्र पाटील, श्रीप्रसाद चौगुले.
डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे सॉफ्टस्कील प्रोग्रामस, देण्यात येणारे इंडस्ट्रीयल प्रशिक्षण, इंडस्ट्री भेटी, गेस्ट लेक्चर्स या सर्वांचा फायदा या विद्यार्थ्यांना होत असतो. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानाच जगभरातील विविध कंपन्यात प्रशिक्षणासाठी पाठविणारी व उत्तमोत्तम प्लेसमेंट करणारी डीकेटीई ही संस्था देशात आघाडीवर आहे.शिक्षणाबरोबरच प्लेसमेंट बाबतही आज पालक आणि विद्यार्थी विचार करत असतात. या दोन्ही क्षेत्रात डीकेटीई सर्वोत्तम कामगिरी करत आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आण्णा आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे तसेच सर्व ट्रस्टी यांनी अभिनंदन केले. संस्थेच्या प्र. संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, टीपीओ प्रा. एस.बी.अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.