no images were found
शक्ती, संतुलन आणि आत्मविश्वास: सोनी सब कलाकारांनी महिला दिनानिमित्त खंबीर स्त्रीत्वाचे केलेले चिंतन
सामर्थ्य नेहमीच मोठ्या आवाजात दिसून येत नाही. कधी ते शांत धैर्यात, पुन्हा उभं राहण्याच्या ताकदीत आणि कुटुंब, कामाची जागा आणि स्वप्नं एकत्र सांभाळण्याच्या क्षमतेत दिसतं. महिला दिन हा फक्त साजरा करण्याचा दिवस नाही, तर महिलांनी निभावलेल्या विविध भूमिका आणि त्यांनी निर्माण केलेल्या परिणामांची दखल घेण्याचा दिवस आहे. सोनी सब वरील पात्रं अनेकदा मजबूत, संवेदनशील आणि ठाम महिलांचं दर्शन घडवतात — मग ती आई असो जी कुटुंब एकत्र ठेवते, तरुण मुलगी असो जी स्वतःचा आवाज शोधते किंवा जोडीदार असो जी समानतेने उभी राहते. पडद्यावरच्या या कथा खऱ्या आयुष्यातही जवळच्या वाटतात.
या महिला दिनानिमित्त सोनी सब कलाकार सुम्बुल तौकीर खान, करुणा पांडे, अक्षया हिंदळकर आणि श्रेणू पारिख यांनी महिलांसाठी सामर्थ्य म्हणजे काय, महत्वाकांक्षा, नातेसंबंध आणि स्वतःच्या वाढीचं संतुलन कसं साधतात याबद्दल सांगितलं. त्यांच्यासोबत अविनेश रेखी आणि रजत वर्मा यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी महिलांविषयी आणि पडद्यावर साकारलेल्या भूमिकांमुळे महिलांच्या सामर्थ्याबद्दल अधिक आदर कसा वाढला याबद्दल विचार मांडले.
इत्ती सी खुशी’मध्ये अन्विता ही भूमिका साकारत असलेली सुम्बुल तौकीर खान सांगतात, “मी खूप लहान वयात काम सुरू केलं, त्यामुळे माझं वाढणं सेटवरच झालं. अनेक वेळा मला स्वतः निर्णय घ्यावे लागले आणि स्वतःवर विश्वास ठेवावा लागला, जरी मनात शंका असली तरी. सुरुवातीचे दिवस आठवतात, जेव्हा सगळं नवीन आणि थोडं अवघड वाटत होतं, पण मी कधी हार मानली नाही. माझ्यासाठी महिला दिन म्हणजे मोठ्या गोष्टी बोलणं नाही, तर एका स्त्रीच्या प्रवासाची दखल घेणं — शिकणं, पडणं, पुन्हा उभं राहणं आणि हळूहळू स्वतःवर अधिक विश्वास ठेवणं.”
पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये पुष्पा पटेल ही भूमिका साकारत असलेली करुणा पांडे सांगतात “पुष्पा साकारणं माझ्यासाठी खूप वैयक्तिक होतं कारण ती आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या अनेक महिलांचं प्रतिनिधित्व करते. ती घर सांभाळते, भावना सांभाळते, गैरसमज दूर करते आणि तरीही पुढे जात राहते. माझ्या आयुष्यातही असे टप्पे आले जेव्हा मी काम आणि कुटुंब यांच्यात संतुलन साधत होते आणि त्याबद्दल विचार करण्याचीही वेळ नव्हती. महिला दिन हा एक छोटासा थांबा आहे, ज्यात आपण त्या रोजच्या प्रयत्नांची दखल घेतो जे अनेकदा दुर्लक्षित राहतात.”
गणेश कार्तिकेय’मध्ये देवी पार्वतीची भूमिका साकारत असलेली श्रेनू पारिख सांगतात “देवी सती आणि देवी पार्वती साकारताना मला स्त्रीत्वाकडे अधिक खोलवर पाहायला मिळालं. पडद्यावर ती भक्ती, संयम, प्रेम आणि शांत निर्धाराचं प्रतीक आहे. भूमिका तयार करताना मला जाणवतं की हे गुण आजही आपल्या आजूबाजूच्या महिलांमध्ये आहेत. माझ्या वैयक्तिक आयुष्यातही, विशेषतः लग्नानंतर, मला भागीदारी आणि कुटुंबाचं खरं महत्त्व समजलं. माझ्यासाठी महिला दिन म्हणजे तोल सांभाळणं काळजी घेणं, मुळाशी राहणं, पण तरीही स्वतःची ओळख आणि आवाज जपणं.”
पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये राशी ही भूमिका साकारत असलेली अक्षया हिंदळकर सांगतात “लग्न माझ्यासाठी एक नवीन अध्याय ठरला. भागीदारी ही रोजच्या संवादातून आणि परस्पर समजुतीतून तयार होते हे जाणवलं. त्याचबरोबर स्वतःची ओळख जपणं किती महत्त्वाचं आहे हेही शिकले. माझ्यासाठी महिला दिन म्हणजे तोल साधणं आणि आपल्या आजूबाजूच्या महिलांसाठी उभं राहणं. या महिला दिनानिमित्त मी प्रत्येक महिलेला शुभेच्छा देते स्वतःशी प्रामाणिक राहण्याचं धैर्य, स्वप्नं पूर्ण करण्याची ताकद आणि तिला रोज मिळायला हवी ती प्रेम आणि आदर.”
गणेश कार्तिकेय’मध्ये भगवान शिवाची भूमिका साकारत असलेले अविनेश रेखी सांगतात, “पती म्हणून मी जवळून पाहिलं आहे की महिला रोज किती गोष्टी सांभाळतात, अनेकदा न बोलता. ते नाट्यमय नसतं, पण सतत चालू असतं. पडद्यावर गुंतागुंतीच्या भूमिका साकारताना आणि मजबूत महिला सहकलाकारांचं काम पाहताना ही जाणीव अधिक गहिरं झाली. महिला दिन मला आठवण करून देतो की त्या उपस्थितीला आणि प्रयत्नांना गृहित धरू नये, तर रोज त्याची कदर करावी. या खास दिवशी मी प्रत्येक महिलेला शुभेच्छा देतो सामर्थ्य, आदर आणि खरी ओळख मिळावी, फक्त आजच नाही तर रोज.”
इत्ती सी खुशी’मध्ये विराट ही भूमिका साकारत असलेले रजत वर्मा सांगतात “जसं मी मोठा झालो तसं मी छोट्या गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ लागलो, विशेषतः माझ्या आईकडे कठीण प्रसंगातलं संयम, सगळं एकत्र ठेवण्यासाठी लागणारी भावनिक ताकद आणि अनेकदा न बोलता केलेले त्याग. माझ्यासाठी महिला दिन म्हणजे त्या शांत सामर्थ्याची दखल घेणं, जे लक्ष वेधून घेत नाही पण आपल्या आयुष्याला आकार देतं. आणि हे सामर्थ्य फक्त आजच नाही तर नेहमीच आदराने पाहायला हवं.”