
no images were found
न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं
बंगळुरू : बंगळुरू पोलिसांनी तरुण डॉक्टरच्या मृत्यूचे गूढ उघडकीस आणले आहे. इन्स्टाग्रामवर तिचे नग्न पोस्ट केल्याबद्दल धडा शिकवण्यासाठी डॉक्टरचा खून त्याच्या होणाऱ्या बायकोनेच केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे तिने सूड घेण्यासाठी डॉ. विकास राजन याला ठार केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
डॉ. राजन राजन यांनी एमबीबीएसची पदवी युक्रेनमधून केली होती. चेन्नईतील रुग्णालयात प्रॅक्टिस केल्यानंतर तो नोकरीसाठी बंगळुरूला गेला होता. खासगी रुग्णालयात काम करण्यासोबतच डॉक्टर राजन परदेशात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वास्तुविशारद प्रतिभा हिच्याशी ओळख झाली होती. दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाला होकारही दिला होता.
दरम्यान आठवडाभरापूर्वी डॉ. राजन यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या दुखापतीमुळे राजन कोमात गेला होता. त्यातच तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. मात्र अंगावरील गंभीर जखमामुळे पोलिसांनी प्रथम अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती.
पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर डॉ. राजन याचा खून झाल्याचे उघडकीस आले. उयाची भावी पत्नी 27 वर्षीय प्रतिभा आणि तिच्या मित्रांनी डॉ. राजन याच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर डॉ. राजनची प्रकृती खालावल्याने त्याना रुग्णालयात दाखल केले होते.
दक्षिण-पूर्व बंगळुरूचे पोलिस उपायुक्त सीके बाबा यांनी सांगितले की, प्रतिभाला काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर तिचे नग्न फोटो दिसून आले होते. याबद्दल तिने डॉ. राजनला विचारले, त्यावर राजनने तिला सांगितलं की, त्याने एक बनावट आयडी तयार केला आहे. तसेच मनोरंजनासाठी इन्स्टाग्रामवर तिचे न्यूड फोटो शेअर केले. मात्र यामुळे प्रतिभा संतापली आणि तिने राजनला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान 10 सप्टेंबर रोजी प्रतिभाने डॉ. राजनला तिच्या मैत्रिणीच्या घरी नेले. तिथं दोघांमध्ये वाद झाला. या वादात प्रतिभा आणि तिच्या मित्रांनी डॉ. राजन यांना मारहाण केली. या मारहाणीत राजनला गंभीर दुखापत झाली. प्रकृती बिघडल्याने प्रतिभाने राजनला रुग्णालयात नेले, मात्र तिथे तो कोमात गेले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.