
no images were found
१ ऑक्टोबरला सी एन जी पंप बंद राहणार
पुणे : पेट्रोलियम मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार CNG च्या ट्रेड डीलर मार्जिनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी पुणे शहरातील CNG पंप १ ऑक्टोबर 2022 रोजी बंद राहणार आहेत. पुण्यातील सार्वजनिक वाहतूकीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार CNG च्या ट्रेड डीलर मार्जिनमध्ये वाढ व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील टॉरेंट गॅस पंपांवर १ ऑक्टोबरला CNG ची विक्री होणार नसल्याची समजते; कारण पेट्रोलियम मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार CNG च्या ट्रेड डीलर मार्जिनमध्ये वाढ व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. पुण्यात सध्या अधिकप्रमाणात वाहने सीएनजीवरीलच असल्यामुळे पुणेकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. पुण्यात CNG वर मोठ्या प्रमाणात वाहने रिक्षा चालतात. महापालिकेच्या सीएनजीवरील पीएमपीएलच्या बसही आहेत. त्यामुळे पीएमपीएल वाहतुकीवरही याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.