Home सामाजिक महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 136 नागरिकांचे अर्ज दाखल

महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 136 नागरिकांचे अर्ज दाखल

48 second read
0
0
9

no images were found

महापौर सौरुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 136 नागरिकांचे अर्ज दाखल

कोल्हापूर,(प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी व त्यांच्या अडचणी थेट जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबार’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आज महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडत मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले.

            या जनता दरबारात महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी नागरिकांच्या तक्रारी व मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. तसेच प्राप्त झालेल्या तक्रारी तातडीने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जनता दरबारास प्रारंभ करण्यापूर्वी महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जनता दरबारास सुरुवात करण्यात आली.

            यावेळी बोलताना महापौर सौ. रुपाराणी निकम म्हणाल्या की, महापौर म्हणून निवड झाल्यानंतरच दर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबार’ घेण्याचा निर्णय घेतला होता. नागरिकांचे प्रश्न थेट आमच्यापर्यंत यावेत आणि महापालिका प्रशासन व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ते लवकरात लवकर मार्गी लागावेत हा यामागील उद्देश आहे. त्या पुढे म्हणाल्या की, कोल्हापूरच्या नागरिकांना अशा प्रकारे जनता दरबारात येऊन तक्रारी मांडाव्या लागतात, ही खंत वाटते. मात्र प्रशासनातील काही त्रुटी किंवा अडचणी लक्षात घेऊन येणाऱ्या काळात नागरिकांच्या बहुतेक तक्रारी १५ दिवसांच्या आत सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. न्यायालयीन प्रकरणे किंवा इतर काही तांत्रिक बाबी असल्यास त्यासाठी काहीसा कालावधी लागू शकतो. उर्वरित सर्व तक्रारी १५ दिवसांच्या आत निकाली काढण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांचा माझ्यावर असलेला विश्वास अबाधित राखण्यासाठी मी कटिबद्ध असून त्यांच्या अपेक्षांना तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाहीही महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी यावेळी दिली.

            या जनता दरबारामध्ये विविध विभागाचे 136 अर्ज असून यामध्ये पर्यावरण विभागाशी 2, विद्युत 5, अतिक्रमण 5, आरोग्य विभागाशी 22, नगररचना विभागाशी 28, सामान्य प्रशासन विभागाशी 9, शहर अभियंता 23, पाणी पुरवठा  8, घरफाळा विभागाशी 7, इस्टेट विभागाशी 18, परवाना विभागाशी 3, उद्यान 4, पेन्शन विभागाशी 1 व विवाह नोंदणी विभागाशी 1 अर्ज दाखल झाले आहेत.

            यावेळी उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव, गटनेते शारगंधर देशमुख, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, अभिजीत मोकाशी, विजयसिंह देसाई, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य लेखा वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, नगरसचिव सुनील बिद्री, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, भाजपचे राहुल चिकोडे व विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…