Home आरोग्य मेट्रोपॉलिस हेल्थकेअरच्या रत्नागिरी येथील नवीन प्रगत निदान प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन

मेट्रोपॉलिस हेल्थकेअरच्या रत्नागिरी येथील नवीन प्रगत निदान प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन

15 second read
0
0
28

no images were found

मेट्रोपॉलिस हेल्थकेअरच्या रत्नागिरी येथील नवीन प्रगत निदान प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन

 

रत्नागिरी, : निदान सेवा पुरवणारी भारतातील अग्रगण्य कंपनी मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लिमिटेडने रत्नागिरी येथील आपल्या प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. शहरात ही दुसरी प्रक्रिया प्रयोगशाळा सुरू झाली असून यामुळे आरोग्यसेवा सुलभता आणि तंत्रज्ञानातील उत्कृष्टता यात सुधारणा होणार आहे. अंदाजे ८५० चौरस फूट क्षेत्रात पसरलेल्या या अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दररोज २०० नमुन्यांपर्यंत प्रक्रिया होऊ शकते. येथे मूलभूत पॅथॉलॉजीपासून प्रगत आण्विक निदानापर्यंत चाचण्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे.

     नवीन मेट्रोपॉलिस हेल्थकेअर प्रयोगशाळा दुकान क्रमांक ७,८,९, तळमजला, अरिहंत स्क्वेअर, मौजे नक्षणे, आरोग्य मंदिर, रत्नागिरी येथे आहे. या केंद्राचे उद्घाटन मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लिमिटेडचे मुख्य व्यवसाय अधिकारी (पश्चिम, मध्य आणि उत्तर भारत) श्री भूपेंद्र सिंग राजावत यांच्या हस्ते झाले. यावेळी बीयू प्रमुख (उर्वरित महाराष्ट्र) श्री राहुल कावणकर, डॉ. रेश्मा नदाफ, एमडी – पॅथॉलॉजी, लॅब प्रमुख – रत्नागिरी यांच्यासह मेट्रोपॉलिस चे वरिष्ठ टीम सदस्य सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

     या उद्घाटनाबाबत भाष्य करताना मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुरेंद्रन चेम्मेनकोटील म्हणाले, “रत्नागिरीतील या प्रयोगशाळेचे उद्घाटन  म्हणजे टियर 2 आणि टियर 3 शहरांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करण्याकरिता मेट्रोपॉलिसचे समर्पण दिसून येते. यात आमच्या ब्रँडची सुस्थापित ख्याती आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आमची उपस्थिती वाढत असून रत्नागिरीतील या विस्तारमुळे निदान सेवा सुलभतेने उपलब्ध होण्यात मोठी सुधारणा होणार आहे.    हा उपक्रम म्हणजे शहराच्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांना बळ देण्याचा एक धोरणात्मक प्रयत्न आहे. सेवा क्षमता वाढविण्याच्या आणि आरोग्यसेवा सुलभ करण्याच्या आमच्या व्यापक उद्दिष्टांना त्यामुळे बळ मिळाले आहे.”

     मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लिमिटेडचे मुख्य व्यवसाय अधिकारी (पश्चिम, मध्य आणि उत्तर भारत) श्री भूपेंद्र सिंग राजावत म्हणाले, “रत्नागिरीतील आमचे नवीन चाचणी केंद्र नियमित तपासणीपासून प्रगत आण्विक निदानापर्यंत विविध प्रकारच्या चाचण्यांसाठी सुसज्ज आहे. तेही वाजवी खर्चात. या प्रयोगशाळेद्वारे स्थानिक रुग्णालये, दवाखाने, विशेषज्ञ, सामान्य चिकित्सक आणि सरकार यांच्याशी सहकार्य करण्याची, रत्नागिरीच्या आसपासच्या इतर चाचणी केंद्रांसोबत जबाबदाऱ्या वाटून घेण्याच्या संधीबद्दल आम्हाला आनंद आहे. रुग्णांना प्रत्येक टप्प्यावर आजार ओळखण्यासाठी मदत करण्याची आमची वचनबद्धता कायम आहे.”

   मेट्रोपॉलिस हेल्थकेअर भारत आणि परदेशात असंख्य दर्जेदार कामगिरीसाठी ओळखली जाते आणि तिच्याकडे अनेक दशकांचा अनुभव आहे. मेट्रोपॉलिसने चाचणींच्या विस्तृत श्रेणीसाठी  भारतीय संदर्भ तालिका विकसित केली असून ती आता देशभरातील हजारो प्रयोगशाळांद्वारे वापरली जात आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…