no images were found
ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत बचत
कोल्हापूर : ॲमेझॉन इंडिया ने देशभरातील विक्रेत्यांसाठी मोठा दिलासा जाहीर करत १२.५ कोटींहून अधिक उत्पादनांवर झिरो रेफरल फी लागू करण्याची घोषणा केली आहे. २०२५ मध्ये १.२ कोटी उत्पादनांपर्यंत मर्यादित असलेली ही सवलत २०२६ पर्यंत १० पटींहून अधिक वाढवण्यात येणार आहे. १००० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या १८०० हून अधिक विभागांतील उत्पादनांना झिरो रेफरल फी लागू होणार असून यात टी-शर्ट्स, बूट, इअरफोन्स, बेडशीट्स, साड्या, इलेक्ट्रिक केटल्स, फर्निचर, फॅशन ज्वेलरी, खेळणी आदी वस्तूंचा समावेश आहे.
“३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या उत्पादनांवरील फी कपातीमुळे आमच्या ऑर्डर व्हॉल्यूममध्ये ४-५ टक्क्यांनी वाढ झाली असून एएसपी अधिक स्थिर झाले. या लाभाचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवत आम्ही युनिट्स आणि महसुलात १० टक्क्यांची वाढ साध्य केली,” असे अर्बन प्लॅटरचे संस्थापक व Amazon.in वरील विक्रेते चिराग एच. के. नियाय यांनी सांगितले.
याशिवाय ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या उत्पादनांवरील इझीशिप शुल्कात २० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. विक्रेते आता एकाच बॉक्समधून विविध युनिट्स पाठवून दुसऱ्या युनिटवर ९० टक्क्यांहून अधिक फी बचत करू शकतील.
ही नवी फी संरचना १६ मार्च २०२६ पासून लागू होणार असून यामुळे विशेषतः टिअर-२ आणि टिअर-३ शहरांतील लघु व मध्यम व्यवसायांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या निर्णयामुळे विक्रेत्यांना एकूण फीमध्ये ७० टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे आणि नव्या विक्रेत्यांची संख्या वार्षिक तुलनेत ५० टक्क्यांनी वाढली आहे.