Home मनोरंजन इक़बाल खान अक्षय कुमारसोबत ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ मध्ये सहभागी

इक़बाल खान अक्षय कुमारसोबत ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ मध्ये सहभागी

4 second read
0
0
8

no images were found

इक़बाल खान अक्षय कुमारसोबत ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ मध्ये सहभागी

सोनी सब वरील आगामी शो ‘यादें’ बद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे कारण या शोचा लीड अभिनेता इक्बाल खान नुकताच व्हील ऑफ फॉर्च्यून या गेम शोमध्ये खास पाहुणा म्हणून झळकला. हा शो बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार होस्ट करत असून, इक्बालसोबत त्याचे मित्र आणि लोकप्रिय कलाकार मनीष पॉल व करण वाहीही सहभागी झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे हा एपिसोड हास्याने भरलेला आणि प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरला.

       स्टेजवर आपल्या खास अंदाजात इक्बालने अक्षयसोबत मजेशीर गप्पा मारल्या आणि यादें या शोबद्दल काही झलकही शेअर केल्या. मनीष आणि करणसोबतच्या खेळकर क्षणांपासून ते शोच्या मजेदार सेगमेंट्समध्ये भाग घेण्यापर्यंत, इक्बालचा मोकळा आणि उत्साही अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या दरम्यान त्याने आपल्या भूमिकेबद्दल सांगितले डॉ. देव, एक प्रसिद्ध डॉक्टर ज्याचे आयुष्य एका दुर्दैवी अपघातानंतर पूर्णपणे बदलते. स्मृती आणि ओळख हरवल्यानंतर त्याचा प्रवास कसा पुढे जातो, हे या शोमध्ये दाखवले जाणार आहे. इक्बालने सांगितले की त्याला या शोच्या भावनिक आणि मानवी कथानकाने खूप आकर्षित केले आणि ही कथा प्रेक्षकांना नक्कीच भिडेल.

      आपला अनुभव शेअर करताना इक्बाल खान म्हणाला, “अक्षय सरांसोबत शोमध्ये सहभागी होणे ही खूप छान अनुभूती होती. सेटवरील एनर्जी अप्रतिम होती आणि मनीष व करणसोबत शूटिंग केल्यामुळे मजा आणखी वाढली. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर यादें प्रमोट करणे खूप खास वाटतंय कारण हा शो माझ्या मनाजवळचा आहे. ही कथा मानवी भावना खूप जवळून दाखवते आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना डॉ. देवचा प्रवास तितकाच भावेल जितका आम्हाला तो साकारताना भावला.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…