
no images were found
‘पल्याड‘ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर लाँच
फोर्ब्ससारख्या जागतिक किर्तीच्या मासिकानं दखल घेतलेला, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये मानाचे समजले जाणारे सर्वच पुरस्कार आपल्या नावे करणाऱ्या ‘पल्याड’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. मीडियापासून सोशल मीडियापर्यंत सर्वच ठिकाणी या चित्रपटावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला जात असल्यानं रसिकांनाही हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. हि उत्सुकता आणखी शिगेला पोहोचवणारा ‘पल्याड’चा टिझर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा विषय, आशय आणि वातावरणाची झलक दाखवणारा ‘पल्याड’चा टिझर सोशल मीडियावर केवळ धुमाकूळ घालत नसून, या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळेल याचा अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो. ४ नोव्हेंबर रोजी ‘पल्याड’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
चंद्रपुरातील व्हिजनरी व्यावसायिक व निर्माते पवन सादमवार, सुरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी एलिवेट फिल्म्स व एलिवेट लाईफ आणि लावण्य प्रिया आर्टसच्या बॅनरखाली ‘पल्याड’ची निर्मिती केली आहे. के सेरा सेरा डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शैलेश दुपारे यांनी केलं आहे.
यात शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, बल्लारशहामधील बाल कलाकार रुचित निनावे, देवेंद्र दोडके, वीरा साथीदार, सचिन गिरी, सायली देठे, भारत रंगारी, बबिता उइके, रवी धकाते, गजेश कांबळे आदींच्या कलाकारांनी अभिनय केला आहे. चित्रपटाची कथा सुदर्शन खडांगळे यांनी लिहिली असून, सुदर्शन खडांगळे आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी पटकथा व संवादलेखन केले आहे. वेशभूषा विकास चहारे यांनी केली आहे. या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यात, २५ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं आहे.