no images were found
प्रेम, त्याग आणि विरहाची गाथा उलगडते सोनी सबच्या ‘गणेश कार्तिकेय’ मालिकेत
सोनी सब वरील पौराणिक गाथा गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय आता दाखवते भगवान शिव (अविनेश रेखी) आणि देवी सती (श्रेनू पारिख) यांच्या दिव्य प्रवासातील महत्त्वाचे क्षण. राजा दक्ष (नागेश सेलवन) आयोजित भव्य यज्ञातून सुरू झालेला प्रसंग अखेरीस हृदयद्रावक ठरतो आणि नियतीचा प्रवाह बदलतो. जीवन बदलणारे निर्णय घेतले जातात आणि नात्यांची खरी कसोटी लागते.
देव आणि विश्वाच्या उपस्थितीत झालेल्या भव्य विवाहानंतर देवी सतीने भगवान शिवासोबत नवे जीवन सुरू केले. विश्व त्यांच्या मिलनाचा आनंद साजरा करत असताना राजा दक्ष भव्य यज्ञाची घोषणा करतो, पण जाणूनबुजून भगवान शिव आणि देवी सतीला निमंत्रण देत नाही. तरीही सतीच्या मनात आशेचा किरण असतो. “मुलीला नेहमीच वडिलांच्या घरात स्थान असतं” या विश्वासाने ती यज्ञाला जाते, पुनर्मिलनाची अपेक्षा ठेवून. पण तिथे तिला अपमान सहन करावा लागतो. संपूर्ण सभेसमोर राजा दक्ष भगवान शिवाचा अपमान करतो आणि तिच्या विवाहावर प्रश्न उपस्थित करतो. मुलगी म्हणून वडिलांशी नातं आणि पत्नी म्हणून पतीवरील निष्ठा यामध्ये फाटलेली सती मनाने तुटते. पतीचा अपमान सहन न झाल्याने ती पवित्र अग्नीत प्रवेश करते आणि आत्मदहन करते. तिचा हा त्याग संपूर्ण विश्वाला हादरवतो. सतीचा बलिदान भगवान शिवाला प्रचंड तांडवात झोकून देतो आणि वीरभद्र व भद्रकालीचा उदय होतो.
श्रेनू पारिख, जी ‘गणेश कार्तिकेय’मध्ये देवी सतीची भूमिका साकारते, म्हणाली, “मुलगी म्हणून वडिलांच्या स्वीकाराची आशा ठेवणं आणि त्याच वेळी पत्नी म्हणून पतीचा अपमान सहन न करणं हे साकारणं सोपं नव्हतं. मला सर्वात जास्त स्पर्शून गेलं ते म्हणजे सतीची त्या क्षणातील असहाय्यता. ती आशेने आत जाते आणि काही क्षणांतच ती आशा सगळ्यांसमोर तुटते. अभिनय करताना मी सतत विचार करत होते की ज्या घराला आपण आपलं मानलं होतं तेच घर आता परकं वाटू लागलं तर किती वेदना होतील. तो भाव माझ्यासोबत राहिला. माझ्यासाठी हा रागाचा प्रसंग नव्हता, तर एका स्त्रीने शांतपणे स्वतःचा सन्मान निवडण्याचा क्षण होता, जरी तिचं मन तुटत होतं. मला वाटतं प्रेक्षकांना ती वेदना जाणवेल आणि समजेल.”