Home क्राईम सरकारी नोकरीचे बनावट नियुक्ती व ओळखपत्रे देवून २४ युवकांची दीड कोटीची फसवणूक

सरकारी नोकरीचे बनावट नियुक्ती व ओळखपत्रे देवून २४ युवकांची दीड कोटीची फसवणूक

0 second read
0
0
190

no images were found

सरकारी नोकरीचे बनावट नियुक्ती व ओळखपत्रे देवून २४ युवकांची दीड कोटीची फसवणूक

कोल्हापूर : रेल्वे खात्यात, आयकर विभागात भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो असे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे देवून २४ युवकांची १ कोटी,४३ लाखाची फसवणूक केल्याची फिर्याद आनंदा गणपती करडे (रा. ढेपणपुर गल्ली, कुरूंदवाड) याने कुरुंदवाड पोलिसात दिली आहे. याप्रकरणी क्रांती कुमार पाटील (रा.फुलेवाडी,), मोहम्मद कामील अब्दुल गफार (वय41, सध्या रा. कुर्ला मंबई,), अनिस खान गुलाम रसुलखान (वय ४६ रा. काटोल रोड, गोटिक खान (कटोलोड) नागपूर), रुद्रप्रताप भानुप्रताप सिंग (रा. प्लॉट नं. ८ साल्ट लाखे बायपास, एल बी चौक सेक्टर ३ कोलकाता),सुबोधकुमार (रा.पश्चिम राजबटी मध्याग्राम दक्षिण २४ परगनास, कोलकाता) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विविध ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून दाम दुपटीच्या अमिषापोटी अनेकांची फसवणूक झाली हे प्रकरण ताजे असतानाच आता नोकर भरतीचे आमिष दाखवून एका महिलेसह ५ भामट्यांनी चक्क कोल्हापूर जिल्ह्यातील युवक व पालकांना १ कोटी,४३ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार कुरुंदवाड शहरात पुढे आला आहे.
दरम्यान, फसवणूक झालेल्या युवकांनी भामट्याने दिलेल्या बँक खाते क्रमांकावर पैसे पाठवले आहेत. यासर्व बँकेच्या नोंदी तक्रारी सोबत सादर केल्या आहेत. आयकर विभागातून माहिती घेण्यात आली आहे. ही फसवणूक झाली असून आर्थिक गुन्हे अन्वेषणने केलेल्या पडताळणी आणि जिल्हा पोलिस प्रमुख शैलेंश बलकवडे यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सपोनि बालाजी भांगे यांनी दिली.
फिर्यादी आनंदा करडे यांच्या एका मुलाला आयकर विभाग, दिल्ली येथे तर दुसऱ्या मुलाला आर्मीत भरती करतो असे सुबोधकुमारने सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी १५ लाख रुपये घेतले आहेत. करडे व त्यांच्या सहकाऱ्यांना आर्मीत 35 मुलांची बॅच पाठवायची आहेत, आणखी मुले असतील तर घेऊन या असे आमिष दाखवल्याने जिल्ह्यातील गडहिंग्लज,आजरा,कोल्हापूर, इचलकरंजी,शिरोळ कुरुंदवाड येथील २४ युवकांच्या पालकांनी सुबोधकुमार याच्या वेळोवेळी मागणीनुसार लाखो रुपये यांनी सांगितलेल्या खात्यावर जमा केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी द्यावा, खासदार धनंजय महाडिक यांचं केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी.आर.पाटील यांना निवेदन

  जलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी…