Home मनोरंजन हंगामा प्ले  वर नवीन मालिका – हसरतें

हंगामा प्ले  वर नवीन मालिका – हसरतें

26 second read
0
0
148

no images were found

हंगामा प्ले  वर नवीन मालिका – हसरतें

 मुंबई : हंगामा प्लेहा हंगामा डिजीटल मीडिया मालकीचा अग्रगण्य ओटीटी प्लॅटफॉर्म असून त्यांच्या वतीने नवीकोरी हिंदी कथासंग्रह मालिका – हसरतें लॉन्च करण्यात आली. या मालिकेत सुप्रसिद्ध कलाकार मोनालिसाअदा खानकृष्णा मुखर्जीरवी भाटियाविन राणाशिल्पा तुळसकरसना सय्यदसिद्धार्थ शर्माआयुष आनंद आणि साहिल उप्पल मुख्य भूमिकांमध्ये दिसतील. ही मालिका शाकुंतलम टेलिफिल्म्स निर्मित आणि हेमंत प्रभूनीलिमा बाजपेयी आणि अंशूमन किशोर सिंह दिग्दर्शित आहे. हसरतें’मध्ये पुरुषसत्ताक समाजात समानतेच्या शोधात असलेल्या वेगवेगळ्या वयातील पाच महिलांच्या कथा असून स्वत:च्या इच्छांची क्षमापूर्ती न करता कृती करणाऱ्या या स्त्रिया आहेत.     

 पुरुषाच्या इच्छांवर त्याचा अधिकार असतोबाईच्या सुखाची अभिव्यक्ति आणि तिला असलेली प्रेमाची गरज बऱ्याचदा दुर्लक्षित करण्यात येते किंवा टीकेला पात्र ठरते. या मालिका संग्रहातील कथा पाच छोट्या शहरांतील महिलांवर आधारीत असून त्या समाजाने निर्माण केलेल्या विपरीत स्थिती व आव्हानांत अडकलेल्या आहेत. त्या एकीकडे स्वत:च्या इच्छांची पूर्तता तर दुसरीकडे असमान सामाजिक रितींचा सामना करताना दिसतात.   

 हंगामा डिजिटल मीडियाचे सीईओ श्री. सिद्धार्थ रॉय म्हणालेहंगामात आमच्या प्रेक्षकांच्या जीवनाचा अर्थ आणि मूल्य वाढवणाऱ्या कथा सांगण्याचा आमचा उद्देश आहे. हसरतें मधील व्यक्तिरेखा व्यावहारिक शरीर प्रेमाच्या साचेबद्ध बांधणीपासून दूर आहेतजिथे पुरुषी इच्छेच्या महत्त्वावर जोर असतोही मालिका स्त्रीच्या दृष्टिकोनातून या विषयाला संबोधित करते. आम्हाला आशा आहे की प्रत्येक कथा प्रेक्षकांवर कायमची छाप उमटवेल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील १२ खेळाडूंना खासदार महाडिक यांच्याकडून प्रत्येकी १० हजाराचं बक्षीस प्रदान

  ७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील १२ खेळाडूंना खासदार महाडिक यांच्याकडून प्…