Home शासकीय पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

10 second read
0
0
113

no images were found

पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने खासगी आस्थापनांच्या 10 वी,  12 वी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बीई इत्यादी पात्रतेच्या रिक्त पदांसाठी दिनांक 15 व 16 डिसेंबर रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्या’चे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सं. कृ. माळी यांनी दिली आहे.

हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपला युझर आयडी व पासवर्डच्या आधारे जिल्हा कौशल्य विभागाच्या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर लॉगीन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित रिक्तपदासाठी आपला पसंतीक्रम व इच्छुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी.

 इच्छुक युवक- युवतींनी दि. 16 डिसेंबर पर्यंत आपले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …