
no images were found
चारचाकी वाहनाची 19 डिसेंबर पासून नवीन नोंदणी क्रमांकाला सुरुवात
कोल्हापूर : खासगी चारचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका एम.एच.09-जी.ए. ही रविवार दि. 18 डिसेंबर रोजी संपुष्टात येत असून, नवीन चारचाकी वाहनांची मालिका नोंदणी एम.एच.09-जी.एफ. ही सोमवार दि. 19 डिसेंबर पासून नव्याने सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील चारचाकी वाहनधारकांनी आपल्या पसंतीच्या क्रमांकाचे अर्ज सोमवार दि. 19 व 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खिडकी क्रमांक 9 येथे स्विकारण्यात येतील.