no images were found
शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाच्या सुशोभिकरणासाठी 9 कोटी 40 लाखाचा निधी वर्ग
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील श्रीमंत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे सुशोभीकरण व इतर कामे करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 9 कोटी 40 लाख 56 हजार 108 एवढा निधी जिल्ह्याला वर्ग करण्यात आला आहे.
या निधीमधून प्रस्तवित करण्यात आलेले कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील श्रीमंत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे सुशोभीकरण व इतर कामे सुरु करण्याबाबतची कार्यवाही समाज कल्याण विभाग व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या समन्वयाने तातडीने करण्यात येणार असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी कळविले आहे.