no images were found
महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत बचत गट व महिलांना चेक वाटप
कोल्हापूर : नवतेजस्विनी महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पअंतर्गत Vulnerable Support Programme मधील बचत गट व वैयक्तिक महिलांना चेक वाटपचा कार्यक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
अतिगरीब महिलांना उद्योग व्यवसायची सुरुवात /वाढ करण्याकरिता वैयक्तीक कर्ज पुरवठा. यामध्ये १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ज्या स्वय –सहाय्यता महिला बचत गटांनी गेल्या ५ वर्षात एकदाही कर्ज घेतले नाही किंवा काही अपरिहार्य कारणाने (नैसर्गिक आपत्ती /स्थलांतर )कर्ज परतफेड न केल्यामुळे PTR सिद्ध झालेल्या बचत गटांना समुपदेशन करून अल्प व्याज दराने कर्ज पुरवठा वितरण करण्यात येणार आहे. माविम कोल्हापूर मध्ये सन 2022 -23 या आर्थिक वर्षात 14 बचत गट व 115 वैयक्तीक महिलांना कर्ज वाटप करण्यात येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण यांच्या हस्ते राधाकृष्ण, भीमरत्न व स्वराजली या बचत गटांना प्रत्येकी 50 हजार रुपये व वैयक्तिक महिला पल्लवी चौगुले, सुषमा कांबळे, महिला चंद्रभागा गवळी व जयश्री हजारे यांना प्रत्येकी 15 हजार रुपयाचा धनादेश वाटप करण्यात आला ज्या महिलांना 15हजार रुपये देण्यात आले आहे त्या महिला BC Point सुरू करणार आहेत
कार्यक्रम आभार प्रदर्शन उमेश लिंगणूरकर यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन व्यवस्थापक रवींद्र कुंभार यांनी केले. या कार्यक्रमास लेखाधिकारी विनायक कुलकर्णी, उमेश लिंगणूरकर, विजय कलकुटकी, cmrc व्यवस्थापक, सहयोगिनी व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.