Home क्राईम दिल्लीत बारावीच्या विद्यार्थीनीवर अ‍ॅसिड हल्ला

दिल्लीत बारावीच्या विद्यार्थीनीवर अ‍ॅसिड हल्ला

4 second read
0
0
165

no images were found

दिल्लीत बारावीच्या विद्यार्थीनीवर अ‍ॅसिड हल्ला

दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत १२ वीत शिकणाऱ्या एका मुलीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आलेला आहे. या घटनेमध्ये मुलीच्या चेहऱ्यास गंभीर इजा झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेवेळी पीडित मुलीसोबत तिची लहान बहिण होती. त्यावेळी या मुलीच्या चेहऱ्यावर अचानक अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोघांवर संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास दिल्लीमधील द्वारका मोड परिसरात घडली.

मुलीला सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. मुलगा व मुलगी यांची परस्पर ओळख होती असे समजते. मुलगी बारावीची विद्यार्थिनी असून घटनेनंतर दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलीला सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. दिल्ली पोलिसांनी अधिक माहिती देताना म्हटले आहे की, की पीडितेला रुग्णालयात चांगल्या वैद्यकीय सुविधा दिल्या जात आहेत. मात्र, मुलीवर अॅसिड फेकण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हल्लेखोर आणि पीडित मुलगी एकमेकांना ओळखत होते असे सांगितले जात असून, जखमी मुलीला सफदरजंग रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. पीडितेवर हा हल्ला नेमका का करण्यात आला याचे कारण अद्याप समजू शकलेले नसून, दिल्ली पोलीस तपास करत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…