no images were found
बस उलटून १५ महिन्यांच्या बाळासह ६ जण ठार
उत्तर प्रदेश : फिरोजाबाद येथील आग्रा लखनौ एक्स्प्रेस हायवेवर बसचा भीषण अपघात घडला. ही भरधाव बस थेट दरीत कोसळली. एकूण ४५ ते ५० प्रवासी बसमध्ये असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बुधवारी पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ पोलीस घटनस्थळी दाखला होऊन बचावकार्य सुरु करण्यात आले. पंजाबमधील लुधियाना वरुन रायबरेली येथे प्रवासी घेऊन ही बस चालली होती. पण बस अतिशय वेगात असल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून ही बस एक्स्प्रेसवर पटली होऊन मोठी दुर्घटना घडली. या अपघातामध्ये ६ जण ठार झाले तर सुमारे २२जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबाबत दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांमध्ये ४ पुरुष, १ महिला आणि २ मुलांचा समावेश आहे. अपघातात ठार झालेल्या प्रवाशांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात १५ महिन्यांच्या एका बाळाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर २२ वर्षांची एक विवाहित महिलाही ठार झाली आहे. या अपघातात जखमी झालेल्या २२ पैकी ९ जणांची प्रकृती नाजूक आहे. त्यांना शिकोहाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. अन्य जखमी प्रवाशांवर सैफई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत. अपघातात बसचेही मोठे नुकसान झाले आहे.