
no images were found
१७ व १८ डिसेंबर रोजी गार्डन क्लबतर्फे भव्य पुष्पप्रदर्शन
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका व गार्डन क्लब कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक १७ व १८ डिसेंबर रोजी महावीर उद्यानामध्ये भव्य पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आगळे वेगळे असणाऱ्या गार्डन क्लबच्या या पुष्य प्रदर्शनाची उत्कंठा अनेक निसर्गप्रेमींना लागलेली असते. कोरोनाच्या निर्बंधामुळे मागील दोन वर्ष गार्डन क्लबचे पुष्पप्रदर्शन मर्यादित स्वरूपात झाले होते. चालू वर्षी गार्डन क्लबचे ५२ वे पुष्पप्रदर्शन आहे. यानिमित्त पुष्पप्रदर्शनाबरोबरच अनेक स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये गुलाब आणि विविध प्रकारची फुले, पुष्परचना, कुंडीतील रोपे फुले, पाने व पाकळ्यांची रांगोळी, युके, सलड डेकोरेशन, बोनसाय, मुक्त रचना, लैंडस्केपिंग इ. च्या स्पपांचे आयोजन केले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार दि १७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी अकरा वाजता डॉ.सौ. कादंबरी बलकवडे आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांच्या अध्यक्षेखालील, प्रमुख पाहुणे उद्योगपती सचिन शिरगावकर, सौ शांतादेवी डी. पाटील व मौर्या ग्रुपचे मंगेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी पाच वाजता तरुणाईचे आकर्षण असलेला लाईट्स व डीजे संगीताच्या साथीने होणारा बॉटनिकल फैशन शो मराठी अभिनेते विराट मडके यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बॉटनिकल फैशनशोसाठी निसर्गातील पाना फुलांचा वापर करून विविध महाविद्यालयातील युवक युवती भाग घेत असतात.
रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. फुलबाग, फुले व बुके या विषयावर आधारित ही स्पर्धा आयोजित केली असून त्यासाठी इ. पहिली ते इ. तिसरी, इ. चौथी ते इ. सातवी इ. आठवी ते इ. दहावी (खुला गट) अशी गट विभागणी केली आहे. सायंकाळी पाच वाजता विविध स्पर्धातील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण समारंभ संयुक्त आयुक्त राज्य जीएसटी सुनीता थोरात यांच्या हस्ते व आर.एल. तावडे फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शोभा तावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. हे सर्व कार्यक्रम महावीर उद्यानात होणार असून या फ्लॉवर शोच्या निमित्ताने बागेसंबंधी विविध वस्तूंचे स्टॉल तसेच खाद्यवस्तूंचे स्टॉल असणार आहेत. या प्रदर्शनाचा लाभ निसर्गप्रेमी व रसिकांनी घ्यावा. अशी माहिती अध्यक्ष गार्डन क्लबच्या अध्यक्ष कल्पना सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत कदम सेक्रेटरी पल्लवी कुलकर्णी, आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.