no images were found
स्कोडा ऑटो इंडियाकडून नवीन एसयूव्ही कायलॅकचे अनावरण
मुंबई,:स्कोडा ऑटो इंडियाने पहिल्यांदाच भारत व जगासाठी बहुप्रतिक्षित एसयूव्ही ‘कायलॅक’चे अनावरण केले आहे. कायलॅक भारतात स्कोडा ऑटोसाठी न्यू एराची सुरूवात करत आहे, जेथे ब्रँड नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासोबत नवीन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. कंपनीने यंदा फेब्रुवारीमध्ये या एसयूव्हीच्या घोषणेसह भारतात अधिक विस्तार करण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षांना अधिक दृढ केले. यंदा ऑक्टोबरमध्ये स्कोडा ऑटो इंडियाने कायलॅकच्या कमॉफ्लेज प्री-प्रॉडक्शन व्हर्जनच्या ड्रायव्हिंग चाचण्या केल्या. एक महिन्यानंतर कायलॅकचे वर्ल्ड प्रीमियर करण्यात आले आहे, तसेच बुकिंग्जना २ डिसेंबर २०२४ पासून सुरूवात होईल.
कायलॅक
भारतीयांनी स्कोडा कायलॅकचे नामकरण केले आहे. हे नाव क्रिस्टलसाठी (स्फटिक) संस्कृत शब्दामधून घेण्यात आले असून कैलास पर्वताच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. स्कोडा ऑटो इंडियाच्या एसयूव्ही लाइन अपमधील मोठ्या कुशकचे देखील सम्राटसाठी संस्कृत शब्दावरून नाव ठेवण्यात आले आहे. कायलॅक कंपनीच्या कोडियक, मोठी ४x४ आणि मध्यम आकाराची कुशक अशा एसयूव्हींच्या रोस्टरमध्ये अधिक भर करते. कायलॅकमध्ये काही सेगमेंट-फर्स्टस् वैशिष्ट्ये आहेत, जसे सिक्स-वे इलेक्ट्रिक सीट्ससह ड्रायव्हर व पुढील प्रवासीसाठी व्हेण्टिलेशन. कायलॅकमधील बूट स्पेस तिच्या विभागातील सर्वोत्तम आहे, जे ४४६ लिटर आहे. कारमध्ये ऑटो क्लायमेट्रॉनिकसह इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससाठी व्हेण्टिलेशन देखील आहे. निवडक व्हेरिएण्ट्स इलेक्ट्रिक सनरूफसह देखील उपलब्ध आहेत.
शक्तीसह कार्यक्षमता व सुरक्षितता
कायलॅक मॅन्युअल ट्रान्समिशनसह १०.५ सेकंदांमध्ये १०० किमी / तास गती प्राप्त करू शकते. या एसयूव्हीची अव्वल गती १८८ किमी/तास आहे. या कारमधील १.० टीएसआय इंजिन ८५ केडब्ल्यू शक्ती आणि १७८ एनएम टॉर्कची निर्मिती करते. हे पॉवरप्लांट (इंजिन) सिक्स-स्पीड मॅन्युअल किंवा सिक्स-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकसह निवडक व्हेरिएण्ट्समध्ये पॅडल शिफ्टर्ससाठी डिझाइन करण्यात आले आहे. ही कार कुशक व स्लाव्हियाप्रमाणे एमक्यूबी-एओ-इन व्यासपीठावर आधारित आहे.