no images were found
टाटा ऍसेट मॅनेजमेंटचा नवा टाटा इंडिया इनोवेशन फंड लॉन्च
मुंबई : टाटा ऍसेट मॅनेजमेंटने टाटा इंडिया इनोवेशन फंड लॉन्च केला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नवीन धोरणे आणि संकल्पना अंमलात आणून लाभ मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवली वृद्धीच्या संधी गुंतवणूकदारांना प्रदान करणे हे या फंडाचे उद्दिष्ट आहे. एनएफओ (नवीन फंड ऑफर) ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुली होईल.
भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये यशस्वी आणि वृद्धीला पूरक अशा दोन्ही प्रकारच्या नावीन्यपूर्णतेमध्ये प्रयत्नशील कंपन्या आहेत, ज्या आपापल्या क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहेत. क्रांतिकारी नावीन्य परिवर्तनकारी प्रगतीला प्रोत्साहन देते, संपूर्णपणे नव्या बाजारपेठा तयार करते, वृद्धीला पूरक नावीन्य वर्तमान उत्पादने, सेवा, प्रक्रियांमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा घडवून आणते.
परिवर्तनकारी नावीन्य घडवून आणण्यात आघाडीवर असलेल्या, संशोधन आणि विकास, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल परिवर्तन यासारख्या तंत्रज्ञानाचा लाभ घेणाऱ्या कंपन्यांना टार्गेट करण्याचे टाटा इंडिया इनोवेशन फंडचे धोरण असेल.
भारतातील आर्थिक सेवा उद्योगक्षेत्राने देशात नवे डिजिटल युग आणण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग केला आहे, त्यामुळे देशभरात आर्थिक समावेशाचा विस्तार झाला आहे. ग्लोबल क्लायमेट ऍक्शन स्टँडर्ड्सनुसार, भारतातील इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही), बॅटरी तंत्रज्ञान आणि नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक व विकासाची गती वाढत आहे. त्यासोबतच फार्मास्युटिकल आणि हेल्थकेयर क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकास गुंतवणूक, संशोधन आणि उत्पादन यांचे एक जागतिक केंद्र म्हणून भारताची ओळख निर्माण होत आहे.
त्याखेरीज भारत सरकारच्या ‘वोकल फॉर लोकल’ धोरणाने आणि विकासाला अनुकूल उपाययोजनांनी ग्लोबल इनोवेशन इंडेक्समधील देशाच्या रँकिंगमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. २०१५ मध्ये ८१ व्या स्थानावर होता आणि २०२४ मध्ये ३९ व्या स्थानावर पोहोचला आहे. या अनुकूल वातावरणामुळे नावीन्याला प्राधान्य देणाऱ्या कंपन्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे (स्रोत: वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायजेशन, आयपी इंडिया, टाइम्स हायर एज्युकेशन)
फंडच्या लॉन्च प्रसंगी टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे चीफ बिझनेस ऑफिसर श्री आनंद वरदराजन यांनी सांगितले, “गुंतवणुकीमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात: एक म्हणजे अशी कंपनी ओळखणे जी पुढील १० पेक्षा जास्त वर्षे चालेल आणि दुसरे म्हणजे पुढील दशकामध्ये पैसे कमवण्याची त्या कंपनीची क्षमता. यापैकी फक्त एक गोष्ट असणे पुरेसे नसते. कंपन्यांच्या यशामध्ये इनोवेशनची भूमिका खूप महत्त्वाची असते. ही एक अशी गोष्ट आहे जी कंपनीचे अस्तित्व आणि विकास यामध्ये मदत करते. वाढीला पूरक आणि क्रांतिकारी इनोवेशनमुळे हे शक्य होते. इनोवेशनमुळे प्रतिस्पर्धात्मक लाभ आणि पुढे राहण्याची क्षमता मिळते. भारत डिजिटल, उत्पादन आणि सेवा इनोवेशनमध्ये सर्वात पुढे आहे, त्यामुळे अनेक संधी खुल्या झाल्या आहेत. यशस्वी होण्यासाठी आणि वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्नशील कंपन्यांमध्ये संधी प्राप्त करणे या फंडाचे उद्दिष्ट आहे.”
टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे प्रमुख गुंतवणूक अधिकारी श्री राहुल सिंह यांनी सांगितले, “भारतात आर्थिक, आरोग्य तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह सोल्युशन्स, ग्राहक तंत्रज्ञान आणि त्याहून जास्त डिजिटलीकरणाच्या नेतृत्वामध्ये विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडून येत आहे. ग्लोबल इनोवेशन रँकिंगमध्ये सातत्यपूर्ण वाढीसोबत, आम्ही डिजिटल कॉमर्स, ग्रीन मोबिलिटी, ईव्ही बॅटरी इन्फ्रास्ट्रक्चर, स्पेस टेक आणि प्रगत आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण पावले उचलत आहोत. टाटा इंडिया इनोवेशन फंड या परिवर्तनाचे लाभ मिळवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा फंड गुंतवणूकदारांना नावीन्याच्या लाटेचे नेतृत्व करणाऱ्या विकासामध्ये सहभागी होण्याची संधी देतो.”
टाटा इंडिया इनोवेशन फंड बॉटम-अप इनोवेशनवर आधारित स्टॉक निवड दृष्टिकोन स्वीकारेल, जो मूल्यांकन सुविधा आणि विकास क्षमता प्रदान करेल. हा फंड मार्केट कॅप आणि सेक्टर्समध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधेल. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आलेल्या या फंडाचा उद्देश भारतातील नावीन्याच्या लाटेमुळे निर्माण होत असलेल्या संधींचा लाभ घेणे हा आहे.