Home सामाजिक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात ३१ मे रोजी दोन ग्रंथांचे प्रकाशन

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात ३१ मे रोजी दोन ग्रंथांचे प्रकाशन

5 second read
0
0
15

no images were found

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात ३१ मे रोजी दोन ग्रंथांचे प्रकाशन

कोल्हापूर, (प्रतिनिधी):-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दोन महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन येत्या शनिवारी (दि. ३१) सकाळी १० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात करण्यात येणार आहे. 

     शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनाच्या वतीने नियोजित ग्रंथमालेअंतर्गत डॉ. मच्छिंद्र गोफणे आणि डॉ. नीलेश शेळके लिखित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर: जीवन आणि कार्य’ हा ग्रंथ आणि दत्तात्रय भैरवनाथ घुटूगडे संपादित ‘कोल्हापूर पुराभिलेखागारातील राजर्षी छत्रपती शाहू दप्तरातील होळकर रियासतीसंबंधी कागदपत्रांची सूची’ अशा दोन ग्रंथांचे प्रकाशन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. ही माहिती अध्यासनाचे समन्वयक डॉ. मच्छिंद्र गोफणे आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद्र सरकारची मान्यता, 

  ४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद…