शिवाजी विद्यापीठात प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना डॉ. तारा भवाळकर कोल्हापूर,(प्रतिनिधी):- डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या संशोधनातून लोकसाहित्यातील आदिमतेबरोबरच अद्यतनता अधोरेखित केली आणि लोकसाहित्याच्या अभ्यास, संशोधनाला व्यापक आयाम प्रदान केले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार डॉ. मोरे यांच्या हस्ते लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक तथा …