Home चर्चासत्र विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

9 second read
0
0
11

no images were found

विद्यापीठात जीएसटीच्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

कोल्हापूर,(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाचा वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग आणि भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “जीएसटी रिफॉर्म्स, डिजीटायझेशन अँड इझ ऑफ डुईंग बिझनेस: मार्चिंग टूवर्ड्स विकसित भारत@२०४७” या विषयावर दि. २३ मार्चपासून दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले आहे. ही माहिती अधिविभागाचे प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी दिली आहे.

या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रासाठी केंद्रीय जीएसटी व केंद्रीय उत्पादन शुल्क, वडोदरा येथील प्रधान आयुक्त सुरेंद्र मानकोस्कर प्रमुख पाहुणे म्हणून तर केंद्रीय विद्यापीठ, कर्नाटक येथील डॉ. व्ही. पांडुरंग बीजभाषक म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी अध्यक्षस्थानी असतील. या दोन दिवसीय चर्चासत्रामध्ये ‘आयसीएआय’च्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य उमेश शर्मा, धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठातील डॉ. अंजू ताम्रगुंडी, नामदेव गवस (गोवा), सी.ए. आदित्य सोनटक्के (मुंबई) हे तज्ज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

जीएसटी सुधारणा, डिजिटलायझेशन, व्यवसाय सुलभता आणि विकसित भारत@२०४७ या विषयांवर चर्चासत्रात सखोल चर्चा होणार असून देशभरातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या चर्चासत्रासाठी संबंधित क्षेत्रातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व इच्छुकांनी सहभागासाठी नोंदणी करावी तसेच शोधनिबंध सादर करावेत, असे आवाहनही डॉ. महाजन यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In चर्चासत्र
Comments are closed.

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…