Home चर्चासत्र महात्मा फुलेंची राष्ट्रकल्पना लोकशाहीवादी होती : डॉ. सदानंद मोरे : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुलेंच्या राष्ट्रउभारणीतील योगदानावर राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ

महात्मा फुलेंची राष्ट्रकल्पना लोकशाहीवादी होती : डॉ. सदानंद मोरे : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुलेंच्या राष्ट्रउभारणीतील योगदानावर राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ

0 second read
0
0
7

no images were found

महात्मा फुलेंची राष्ट्रकल्पना लोकशाहीवादी होती : डॉ. सदानंद मोरे : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुलेंच्या राष्ट्रउभारणीतील योगदानावर राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ

कोल्हापूर, -: महात्मा जोतिराव फुले यांची राष्ट्रकल्पना लोकशाहीवादी होती. ब्रिटिशांच्या प्रचलित राज्यकल्पनेपेक्षा वेगळी राष्ट्रनिर्मितीची संकल्पना त्यांनी मांडली. एकमय समाज, एकमय राष्ट्र या संकल्पना महात्मा फुलेंनी मांडल्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागातर्फे प्रा. डॉ. एन. डी. पाटील लोकचळवळ अध्ययन केंद्र, आंतरभारती शिक्षण मंडळ, गांधी अभ्यास केंद्र आणि कॉम्रेड दत्ता देशमुख अध्यासन यांच्या सहकार्याने आयोजित ‘महात्मा फुलेंचे राष्ट्रउभारणीतील योगदान’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या बीजभाषणात ते बोलत होते.

डॉ. मोरे म्हणाले, महात्मा फुले यांनी इंग्लंडमधील उमरावशाहीवर टीका केली होती. हंटर आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. फुले ब्रिटिश नोकरशाहीच्या विरोधात होते. त्यांची भूमिका लोकसत्तावादी होती. समाजातील जातिभेद नष्ट करूनच समताधिष्ठित राष्ट्राची उभारणी करता येईल, असा विश्वास त्यांना होता. त्यामुळे फुले यांच्या राष्ट्रकल्पनेचा विचार करताना त्यांच्या सामाजिक समता आणि लोकसत्तावादी दृष्टिकोनाचा विचार करणे आवश्यक आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, महात्मा फुले यांना बहुजन आणि वंचितांचे स्वराज्य निर्माण करायचे होते. प्रस्थापित व्यवस्थेतील विषमता आणि अन्यायाविरोधात त्यांनी विविध वैचारिक प्रवाहांच्या माध्यमातून आवाज उठवला. त्यांच्या विचारांमधून वंचित घटकांच्या हक्कांचा आणि सामाजिक परिवर्तनाचा व्यापक दृष्टिकोन समोर येतो.

कुलगुरू डॅा राजनीश कामत म्हणाले, महात्मा फुलें शिक्षण विषयक कार्य थोर आहे. स्त्री शिक्षणाची ज्योत त्यांनी अथक प्रयत्नांनी पेटवली. सर्व सामान्यांना शिक्षण मिळाले तर राष्ट्र उभारणी होईल, अशी धारणा फुलेंची होती. त्याचे हे कार्य आपल्याला प्रेरणा देणारे आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In चर्चासत्र
Comments are closed.

Check Also

समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालेत प्रतिपादन

समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्या…