Home व्याख्यान समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालेत प्रतिपादन

समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालेत प्रतिपादन

0 second read
0
0
8

no images were found

समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालेत प्रतिपादन

कोल्हापूर, -: सार्वजनिक कल्याणकारी राज्यव्यवस्था असावी, शासनाने कररूपाने जमा केलेल्या निधीचा विनियोग वंचित घटकांच्या कल्याणासाठी करावा, अशी महात्मा जोतिराव फुले यांची भूमिका होती. सिंचन, शेती आणि शिक्षणासारख्या प्रश्नांबाबत फुले यांचे विचार आजही प्रस्तुत असून, समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अभय टिळक यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालेत ‘महात्मा फुले, सार्वजनिक कल्याण आणि शासनव्यवस्था’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रा. डॉ. नंदकुमार मोरे होते.
डॉ. टिळक म्हणाले, शासनाने जमा केलेल्या कराचा योग्य विनियोग करून समाजातील वंचित घटकांच्या गरजांना प्राधान्य दिले पाहिजे. साधनसंपत्तीचे न्याय्य वाटप आणि सार्वजनिक कल्याणाच्या दृष्टीने शासनाची भूमिका महत्त्वाची आहे. शेती, सिंचन आणि शिक्षण या क्षेत्रांतील प्रश्नांचा विचार करताना महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता लक्षात घेणे आवश्यक आहे.
समाजातील ज्या घटकांमध्ये पहिली पिढी शिक्षण घेण्यासाठी पुढे येत असते, त्या घटकांना शासनव्यवस्थेने विशेष बळ देण्याची गरज असते, असे फुले यांचे मत होते. उच्चशिक्षणाच्या माध्यमातून वंचित घटकांना योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सकारात्मक हस्तक्षेप करावा, अशी त्यांची भूमिका होती. नोकरशाहीनेही शासनाच्या कल्याणकारी धोरणांची अंमलबजावणी करताना वंचितांच्या हिताला प्राधान्य द्यावे, असे फुले यांच्या विचारांतून स्पष्ट होते.
महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा विचार केवळ ऐतिहासिक संदर्भात न करता, आजच्या सार्वजनिक धोरणांच्या आणि शासनव्यवस्थेच्या संदर्भातही केला पाहिजे. त्यांच्या विचारांचा समकालीन प्रश्नांशी संबंध जोडून अभ्यास केल्यास सामाजिक न्याय आणि कल्याणकारी राज्याच्या संकल्पना अधिक व्यापकपणे समजून घेता येतील, असेही डॉ. टिळक यांनी नमूद केले.
यावेळी साहित्यिक राजन गवस, डॅा.अवनिश पाटील, डॅा.प्रकाश पवार, डॅा.भारती पाटील, पल्लवी कोरगावकर उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In व्याख्यान
Comments are closed.

Check Also

महात्मा फुलेंची राष्ट्रकल्पना लोकशाहीवादी होती : डॉ. सदानंद मोरे : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुलेंच्या राष्ट्रउभारणीतील योगदानावर राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ

महात्मा फुलेंची राष्ट्रकल्पना लोकशाहीवादी होती : डॉ. सदानंद मोरे : शिवाजी विद्यापीठात महात…