Home व्याख्यान व्यक्तिमत्व विकासातून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास वाढवावा-प्रा. विनोद गवारे

व्यक्तिमत्व विकासातून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास वाढवावा-प्रा. विनोद गवारे

1 second read
0
0
6

no images were found

व्यक्तिमत्व विकासातून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास वाढवावा-प्रा. विनोद गवारे

कोल्हापूर, : यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेज, कोल्हापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई विभागीय समन्वयक प्रा. विनोद मोतीराम गवारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, प्रभावी संवादकौशल्य, नेतृत्वगुण,  आणि सामाजिक बांधिलकी या गुणांचा विकास आवश्यक असल्याचे प्रा. गवारे सर यांनी सांगितले. व्यक्तिमत्व विकास हा सतत चालणारी प्रक्रिया असून विद्यार्थ्यांनी स्वतःमधील गुण ओळखून त्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, स्वयंशिस्त आणि सेवाभाव निर्माण होतो. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला सकारात्मक दिशा मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ प्रशांत नागावकर,पर्यवेक्षक डॉ.अमित रेडेकर,माजी पर्यवेक्षक व विभागीय समन्वयक राजेंद्र कोळेकर, ग्रंथपाल प्रा.रविंद्र मांगले,प्रा. संदीप गावित,प्रा. एच.टी कांबळे, प्रा.व्ही.डी नाईक,प्रा.विशाल वैराट,प्रा.स्वप्निल जाधव,प्रा.सौ.प्रतिभा पाटील,प्रा.सौ.मयुरी तिकोडे,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सौ कुमुदिनी देसाई यांनी केले. सूत्रसंचालन कु .प्रीती गोसावी आणि आभार अनुष्का पोवार यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In व्याख्यान
Comments are closed.

Check Also

भारताची सौदी अरेबिया, बेल्जियम आणि भूतानसोबत सागरी सहकार्याबाबत चर्चा

भारताची सौदी अरेबिया, बेल्जियम आणि भूतानसोबत सागरी सहकार्याबाबत चर्चा : वाढवण, गालाथि…