Home राजकीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत साताऱ्यात शिक्षक व पदवीधर निवडणूक रणनीती वर चर्चा

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत साताऱ्यात शिक्षक व पदवीधर निवडणूक रणनीती वर चर्चा

12 second read
0
0
5

no images were found

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत साताऱ्यात शिक्षक व पदवीधर निवडणूक रणनीती वर चर्चा

पुणे (प्रतिनिधी ):-पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा कोअर कमिटीची बैठक आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत दोन्ही उमेदवार विजयी होण्याबाबत नियोजन करण्यात आले.
      निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक तयारी, कार्यकर्त्यांची भूमिका, मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी करावयाचे नियोजन आणि दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
युवकांना सक्षम करून त्यांच्या प्रगतीसाठी नव्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच शिक्षक व पदवीधरांच्या विविध प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना अधिक बळकट करणे आणि शिक्षक व पदवीधर मतदारांशी प्रभावी संवाद साधणे, या दृष्टीनेही मार्गदर्शन करण्यात आले.
        पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार म्हणून शिक्षकांच्या समस्या, त्यांच्या न्याय्य मागण्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केला आहे.
       शिक्षकांच्या सेवा-सुरक्षेचे प्रश्न, शैक्षणिक धोरणांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, आवश्यक विशेष शिक्षकांची नियुक्ती, तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. 
        या बैठकीस पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री माधुरीताई मिसाळ, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार निरंजन डावखरे, धैर्यशील कदम, प्रियाताई शिंदे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

भारताची सौदी अरेबिया, बेल्जियम आणि भूतानसोबत सागरी सहकार्याबाबत चर्चा

भारताची सौदी अरेबिया, बेल्जियम आणि भूतानसोबत सागरी सहकार्याबाबत चर्चा : वाढवण, गालाथि…