Home राजकीय ”सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करू नका!” राहुल गांधींच्या टीकेला रविंद्र चव्हाण यांचे सणसणीत प्रत्युत्तर……

”सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करू नका!” राहुल गांधींच्या टीकेला रविंद्र चव्हाण यांचे सणसणीत प्रत्युत्तर……

1 second read
0
0
12

no images were found

”सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करू नका!” राहुल गांधींच्या टीकेला रविंद्र चव्हाण यांचे सणसणीत प्रत्युत्तर……

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि भारताच्या जागतिक स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ‘२०१४ पूर्वीचा भारत’ आणि ‘२०१४ नंतरचा भारत’ यातील फरक दोन आंतरराष्ट्रीय छायाचित्रांच्या माध्यमातून अधोरेखित करत त्यांनी राहुल गांधी यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या एकत्रित छायाचित्राच्या आधारे राहुल गांधी यांनी भारताच्या जागतिक भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून रविंद्र चव्हाण यांनी २०११ मध्ये फ्रान्स येथे झालेल्या G20 परिषदेत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग मागील रांगेत उभे असल्याचे, तर २०२४ मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेल्या G20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रस्थानी असल्याचे छायाचित्र शेअर केले. ‘२०१४ पूर्वीचा भारत’ आणि ‘२०१४ नंतरचा भारत’ अशी शीर्षके देत त्यांनी मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताच्या जागतिक प्रतिमेत झालेला बदल अधोरेखित केला आहे.

‘दूध का दूध, पानी का पानी’ असे म्हणत रविंद्र चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या टीकेतील आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीतील विसंगतीवर बोट ठेवले. “भूक सहन होईनाशी झाली की आपल्याला त्यापुढे काहीही दिसेनासं होतं. सत्तेच्या भुकेपुढे राहुलजींचीही हीच अवस्था झालीय,” अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. तसेच, “या भुकेपोटी जर भारताची बदनामी करत सुटाल, तर याद राखा! कोणताही सच्चा भारतीय हे कधीही खपवून घेणार नाही!” असे ठणकावत त्यांनी राहुल गांधी यांना स्पष्ट इशाराही दिला.

जागतिक व्यासपीठावरील भारताच्या स्थानावरून राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना दोन कालखंडांतील छायाचित्रांची तुलना करत रविंद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राजकीय सत्तासंघर्षापलीकडे देशाची जागतिक प्रतिष्ठा महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर थेट प्रहार केला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त निघालेल्या पालखी सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक यांचा सहभाग, वारकऱ्यांसमवेत भक्तीरसात तल्लीन

कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त निघालेल्या पालखी सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक यांचा सहभाग, व…