Home Uncategorized अदाणी एनर्जी सोल्युशन्सला WBSEDCL कडून 2,500  मेगावॅट वीजपुरवठा करण्यासाठी ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ (LoA) प्राप्त

अदाणी एनर्जी सोल्युशन्सला WBSEDCL कडून 2,500  मेगावॅट वीजपुरवठा करण्यासाठी ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ (LoA) प्राप्त

11 second read
0
0
12

no images were found

अदाणी एनर्जी सोल्युशन्सला WBSEDCL कडून 2,500  मेगावॅट वीजपुरवठा करण्यासाठी ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ (LoA) प्राप्त

अहमदाबाद, : अदाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (AESL) ने आज जाहीर केले की, कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी पॉवरपल्स ट्रेडिंग सोल्युशन्स लिमिटेड (PTSL) ला वेस्ट बंगाल स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (WBSEDCL) कडून 25 वर्षांसाठी 1,750 मेगावॅट अक्षय ऊर्जेचा चोवीस तास वीजपुरवठा करण्यासाठी लेटर ऑफ अवॉर्ड’ (LoA) मिळाले आहे. या करारात अतिरिक्त 750 मेगावॅट वीजपुरवठ्याचा पर्यायही (ग्रीनशू पर्याय) देण्यात आला आहे. हा पर्याय वापरल्यास एकूण वीजपुरवठ्याची क्षमता 2,500 मेगावॅट होईल.

या कामासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेत ई-रिव्हर्स लिलावानंतर PTSL कंपनीची यशस्वी निविदाधारक म्हणून निवड झाली. 1,750 मेगावॅट क्षमतेचा वीजपुरवठा 1 जुलै 2028 पासून सुरू होणार आहे. तसेच, अतिरिक्त 750 मेगावॅट वीजपुरवठ्याचा पर्याय स्वीकारल्यास हा पुरवठा 1 एप्रिल 2029 पासून सुरू होईल.

एईएसएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कंदर्प पटेल यांनी सांगितले. “अक्षय ऊर्जेचा चोवीस तास वीजपुरवठा हा भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील बदलांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे अक्षय ऊर्जेचा वापर वाढण्यासोबतच वीज पारेषण यंत्रणेचाही अधिक चांगल्या प्रकारे वापर करता येईल. हा महत्त्वपूर्ण करार मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा करण्यासाठी उपयुक्त ऊर्जा उपाय देण्याची आमची बांधिलकी अधिक मजबूत झाली आहे.  तसेच, पश्चिम बंगालच्या भविष्यातील वीज गरजा पूर्ण करण्यासाठी WBSEDCL सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. PTSL मोठ्या प्रमाणावर वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी पसंतीची भागीदार कंपनी म्हणून वेगाने पुढे येत आहे. ग्राहकांच्या ऊर्जेच्या गरजेनुसार योग्य आणि मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठ्याचे उपाय उपलब्ध करून देण्याची क्षमता कंपनीकडे आहे.

हा करार PTSL च्या वाढत्या ऊर्जा उपाययोजनांच्या व्यवसायात महत्त्वाची भर घालणारा आहे. कंपनीने वीज उपलब्ध करून घेण्यासाठी आतापर्यंत सुमारे 4.6 गिगावॅट सौर आणि पवन ऊर्जा तसेच 3.5 गिगावॅट-तास क्षमतेच्या बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणालीचे (BESS) करार केले आहेत. यासोबतच, उद्योग, डेटा सेंटर्स, व्यावसायिक संस्था आणि वीज वितरण कंपन्या (Discoms) यांसारख्या मोठ्या वीज ग्राहकांसोबत दीर्घकालीन वीजपुरवठा करार करून कंपनी आपली वीजपुरवठा व्यवस्था अधिक मजबूत करत आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त निघालेल्या पालखी सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक यांचा सहभाग, वारकऱ्यांसमवेत भक्तीरसात तल्लीन

कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त निघालेल्या पालखी सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक यांचा सहभाग, व…