Home Uncategorized राष्ट्रीय फार्मसी सप्ताहानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन; न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींचे यश

राष्ट्रीय फार्मसी सप्ताहानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन; न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींचे यश

4 second read
0
0
15

no images were found

राष्ट्रीय फार्मसी सप्ताहानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन; न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींचे यश

कोल्हापूर (प्रतिनिधी) :- श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे राष्ट्रीय फार्मसी सप्ताह २०२६ निमित्त शुक्रवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेसाठी *‘स्वस्थ भारत : Combating Antimicrobial Resistance (AMR)’* ही संकल्पना देण्यात आली होती. विद्यार्थिनींनी आकर्षक व संदेशपूर्ण रांगोळ्यांच्या माध्यमातून प्रतिजैविक प्रतिकार (Antimicrobial Resistance) या विषयाबाबत जनजागृती केली.
या स्पर्धेचे परीक्षण प्रा. निकिता शेटे मॅडम यांनी केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. ए. आर. पुजारी मॅडम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सृष्टी राऊत मॅडम यांनी केले.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रेवती कराडे व संध्याराणी साळवी, द्वितीय क्रमांक तनुष्का कोपार्डे व स्वराली भाबर, तर तृतीय क्रमांक सायली शिंदे व प्रेरणा पाटील यांनी पटकाविला. विजेत्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये कलात्मकता, सामाजिक जाणीव तसेच प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जागरूकता निर्माण झाली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त निघालेल्या पालखी सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक यांचा सहभाग, वारकऱ्यांसमवेत भक्तीरसात तल्लीन

कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त निघालेल्या पालखी सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक यांचा सहभाग, व…