no images were found
‘मोटुल इंडिया’चे कोल्हापुरात आरोग्य शिबिर: २७ जिल्ह्यांत १०८ मोफत शिबिरे; २१ हजारांहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट
कोल्हापूर, : ‘प्रीमियम इंजिन’ आणि ‘औद्योगिक ल्युब्रिकंट्स’ उत्पादक ‘मोटुल इंडिया’ने ‘सेहत की समृद्धी’ या देशव्यापी आरोग्य उपक्रमांतर्गत कोल्हापुरात आरोग्य शिबिराचे आयोजन केले. या शिबिराचा ३०० हून अधिक ऑटो मेकॅनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतला. या वेळी १०० हून अधिक आरोग्य किट्सचे वाटप करण्यात आले.
‘मोटुल इंडिया’तर्फे एप्रिल ते डिसेंबर २०२६ या कालावधीत देशभरातील २७ जिल्ह्यांमध्ये १०८ मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमातून २१ हजारांहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कोल्हापुरातील शिबिर याच उपक्रमाचा एक भाग होते. कंपनीने सांगली जिल्ह्यातील मिरज येथेही असेच शिबिर आयोजित केले.
शिबिरात वैद्यकीय तपासणी, रक्तातील साखर व हिमोग्लोबिन तपासणी, आवश्यक औषधांचे वाटप आणि प्रथमोपचार किट्सची सुविधा देण्यात आली. ‘मोटुल’चे स्थानिक कर्मचारी आणि वितरकांनी नोंदणी, प्राथमिक तपासणी आणि शिबिराच्या समन्वयाची जबाबदारी सांभाळली. ‘भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योग सुरळीत ठेवणाऱ्या व्यक्तींना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, हा ‘सेहत की समृद्धी’ उपक्रमामागील उद्देश आहे. ऑटो मेकॅनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा थेट पोहोचवता येत असल्याचा आम्हाला आनंद आहे,’ असे ‘मोटुल इंडिया’ आणि दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागेंद्र पै यांनी सांगितले.
‘ऑटो मेकॅनिकना दररोज कामाच्या ठिकाणी विविध आरोग्यधोक्यांना सामोरे जावे लागते. मात्र, हे धोके गंभीर समस्यांमध्ये रूपांतरित होईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष होते. डॉक्टर, निदान सेवा आणि तपासण्या थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे,’ असे स्माइल फाउंडेशनचे सहसंस्थापक संतुनू मिश्रा यांनी सांगितले. सन २०२४ पासून ‘मोटुल’ने देशभरात १८,३०० हून अधिक लोकांना आरोग्यसेवा दिली आहे. डिसेंबर २०२६पर्यंत हा उपक्रम आणखी समुदायांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.