Home निवड तंत्रज्ञान अधिविभागामधील १८० विद्यार्थ्यांची राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांत निवड

तंत्रज्ञान अधिविभागामधील १८० विद्यार्थ्यांची राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांत निवड

6 second read
0
0
49

no images were found

तंत्रज्ञान अधिविभागामधील १८० विद्यार्थ्यांची राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांत निवड

 

कोल्हापूर,(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामधील २०२४-२५ या वर्षी १८० विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राइव्हमधून विविध राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध पदांवर निवड झाली आहे.

औद्योगिक क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मोठ्या वापरामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील रोजगारांचे  प्रमाण वाढत असून त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण अभियांत्रिकी शिक्षण अधिविभागात दिले जात आहे. येथील विविध शाखांचा अभ्यासक्रम औद्योगिक कौशल्य, संशोधन व गुणवत्ता विकास आधारित असल्यामुळे विद्यार्थी सक्षम अभियंता बनण्यास मदत होते. निवड झालेले विद्यार्थी कंपन्यामध्ये उत्तम कामगिरी बजावत असल्याने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या विभागातील विद्यार्थ्यांसाठी, कॅम्पस ड्राइव्हच्या माध्यमातून अंतिम वर्षात शिकत असतानाच रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत.

शिवाजी विद्यापीठाचा केंद्रीय रोजगार कक्ष आणि तंत्रज्ञान अधिविभागाचा रोजगार कक्ष यांच्या मदतीने  अनेक कंपन्यांमार्फत विभागात कॅम्पस ड्राइव्ह होत असून दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आणखीही अनेक कंपन्या प्लेसमेंटसाठी अधिविभागाला भेट देत आहेत.

अदानी, इन्फोसिस, ब्रिटानियासह अनेक कंपन्यांत संधी

या वर्षी अधिविभागामधून अनेक नामवंत कंपन्यांनी विद्यार्थ्यांना सर्वसाधारणपणे वर्षाला ३ ते १० लाख रुपयांपर्यतची पॅकेज देऊन निवड केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने इन्फोसिस,  टी.सी.एस., विप्रो,  पारी, डेटाटेक लॅब, सी.एम.एस. कॉम्प्युटर इंडिया लि., जयश्री इलेक्ट्रॉनिक्स, अमूल, नेस्ले इंडिया लि., ब्रिटानिया, अदानी ग्रुप, एल. कॉम. इंटरनॅशनल प्रा. लि., क्रायसो इंडिया लि., टेक्निप एनर्जीज्  प्रा. लि., टुडीप टेक्नॉलॉजी, टेको, व्ही. क्रियेटेक, प्रिवी फायन सर्विसेस लि., वॉलचंदनगर इंडस्ट्रीज लि.,   स्कॉन इन्फ्रास्ट्रक्चर, आर.डी.सी. काँक्रीट, गद्रे मरीन इक्सपोर्ट प्रा. लि., आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी १२० तासांचे मोफत प्रशिक्षण

विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राला पूरक व रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी विभागाचे प्लेसमेंट सेल अधिकारी व सहकारी सतत प्रयत्नशील असून दरवर्षी प्लेसमेंट सेलमार्फत विभागामध्ये तांत्रिक विषयावर व्याख्याने, चर्चासत्रे, करिअर कौन्सिलिंग, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम व कार्यशाळांचे आयोजन केले जाते. प्रत्येक विद्यार्थ्यास १२० तासांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये ऍप्टिट्यूड, ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू यांची तयारी करून घेतली जाते. विभागामार्फत इंडस्ट्रियल ट्रेनिंग व इंडस्ट्रियल व्हिजिट यांचे आयोजन केले जाते. नॅसकॉम व इंडो जर्मन टूल रुम अशा नामांकित संस्थाबरोबर या साठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

अभियांत्रिकीमधील आधुनिक अभ्यासक्रम

अधिविभागामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रामधील विविध आधुनिक शाखांचे शिक्षण दिले जाते. यामध्ये कॉम्प्युटर  सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखांचा समावेश आहे. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये एनव्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, एनर्जी टेक्नॉलॉजी या शाखांचा समावेश आहे.

तंत्रज्ञान अधिविभागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राधान्य मिळण्यासाठी तसेच अधिविभाग औद्योगिक संशोधन केंद्र बनावे, यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील रोजगार संधी मिळाव्यात आणि तंत्रज्ञान अधिविभागाला संशोधन गुणवत्ता केंद्र बनवण्यासाठी विभागाचे संचालक डॉ. अजित कोळेकर, शिवाजी विद्यापीठ प्रशिक्षण व रोजगार कक्ष अधिकारी डॉ. राजन पडवळ, अधिविभागाचे प्रशिक्षण व रोजगार कक्ष अधिकारी डॉ. गणेश पाटील, शामल पवार, सर्व शाखांचे समन्वयक आणि प्राध्यापक कार्यरत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विज…