Home Uncategorized तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला २८ नोव्हेंबर पासून

तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला २८ नोव्हेंबर पासून

1 second read
0
0
8

no images were found

तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला २८ नोव्हेंबर पासून

कोल्हापूर: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने २६ वी तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही व्याख्यानमाला शनिवार दिनांक २८ नोव्हेंबर पासून ते ४ डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. अशी माहिती ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष ॲड.विवेक शुक्ल आणि श्री .महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सीए केदार हसबनीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
व्याख्यानमालेचा शुभारंभ शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. प्रायव्हेट हायस्कूल, खासबाग, कोल्हापूर येथे हे दररोज व्याख्यानमालेचे पुष्प गुंफले जाणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाचे मनोरंजन, ज्ञान, समाजचिंतन व चारित्र्य यांची वृद्धी व्हावी, हा यामागील उद्देश आहे. यासाठी राजकीय, सामाजिक, संरक्षण खाते, कायदेतज्ञ, कलाक्षेत्र तसेच मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील महिला आणि त्या विषयातील निपुण असणाऱ्या जाणकार वक्त्यांना या व्याख्यानासाठी बोलवण्याची परंपरा आहे. तरी या व्याख्यानमालेसाठी विनामूल्य प्रवेश असून याचा लाभ करवीर नगरीतील हजारो रसिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
व्याख्यानमालेमध्ये :
ॲड.सौ.गौरी पाटील: मुलीच्या जन्माचे स्वागत करूया
डॉ.सौ.अपर्णा बेडेकर: ज्ञानेश्वरीची अपूर्वता
सौ. मित्रा देसाई : एका देवीचे साम्राज्य
डॉ.चंद्रकांत कणसे : मधुमेह समज व गैरसमज
सौ.मंजिरी देवरस: सुखाचा पासवर्ड
संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत

मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी : दहशतवाद भारतापुढील आव्हान

या विषयांवर व्याख्यान होणार आहे. व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन प्रा. सुधीर जोशी करणार आहेत.
पत्रकार परिषदेस कार्यवाह श्रीकांत लिमये, डॉ. उदय कुलकर्णी, रामचंद्र टोपकर, ॲड. राजेंद्र किंकर, नंदकुमार मराठे, केदार तेंडुलकर, सुहास तेंडुलकर, किरण धर्माधिकारी, खजानिस प्रसाद खाडिलकर, वृषाली कुलकर्णी, ॲड.पूजा जोशी, प्रशांत कासार …. आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची गरज: डॉ. संबोधी देशपांडे

महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची गरज: डॉ. संबोधी देशपांडे कोल्हापूर,  : महिल…