Home मनोरंजन ‘पत्री सरकार १९४२’ चा इतिहास जाणून घेतला प्रिन्स पद्माराजे हायस्कूलच्या विद्यार्थीनींनी

‘पत्री सरकार १९४२’ चा इतिहास जाणून घेतला प्रिन्स पद्माराजे हायस्कूलच्या विद्यार्थीनींनी

6 second read
0
0
12

no images were found

‘पत्री सरकार १९४२’ चा इतिहास जाणून घेतला प्रिन्स पद्माराजे हायस्कूलच्या विद्यार्थीनींनी

कोल्हापूर (प्रतिनिधी):- भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक धगधगत पर्व रुपेरी पडद्यावर ‘पत्री सरकार १९४२’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून झळकले आहे.या चित्रपटास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.या चित्रपटाच्या प्रसिद्धी निमित्ताने चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ यांनी कोल्हापूरातील प्रिन्स पद्माराजे हायस्कूल येथे भेट देऊन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. 

यावेळी चित्रपटात क्रांतिसिंह नाना पाटील यांची भूमिका साकारणारे कलाकार अनिल राबाडे,सिध्दार्थ बद्दी,शुभम गवई, सौरभ शिवकुमार आणि निर्माते विशाल जाधव उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत प्राचार्या सौ. पाटील यांनी केले. 

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा प्रांतात १९४२ साली प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं. नाना पाटलांच्या प्रेरणेने क्रांती अग्रणी जी डी लाड, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांच्यासारख्या हजारो देशभक्तांनी दरोडेखोरी, जुलुमी,सावकारशाही, इंग्रज सत्ता यांच्याशी यशस्वी लढा देऊन पत्री सरकारची दहशत थेट लंडनच्या संसदेत पोहोचवली. प्रतिसरकारच्या अशा अनेक अज्ञात क्रांतीवीरांची धगधगती शौर्यगाथा घेऊन ‘पत्री सरकार १९४२’ हा चित्रपट  प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे असे माहिती विशाल जाधव यांनी दिली. 

मुख्य अभिनेते अनिल राबाडे यांनी हा सिनेमा केवळ मनोरंजन न करता इतिहासातील एका महत्त्वपूर्ण पर्वाची आठवण करून देणारा ठरणार असल्याचे सांगितले.. ‘भागीरथी मोशन पिक्चर’ तर्फे ‘पत्री सरकार १९४२’ हा चित्रपट असून विशाल गोविंदराव जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती लीलया पार पाडली. तर चित्रपटाचे गीत, संगीत, लेखन, दिग्दर्शन याची धुरा मनीष अनसुरकर यांनी पेलली आहे. कर्तव्य मोकल यांनी संकलनाची बाजू सांभाळली आहे तर संदीप वाटवे, सुमेध मराठे, परमहंस पाठक यांचे छायाचित्रण आहे. सौरभ लता शिवकुमार यांनी पार्श्व संगीताची जबाबदारी उचलली असून विशाल जाधव, गोरख गुंजाळ, अनन्या नाईक, आनंद मेनन यांनी आपल्या दमदार आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध केली आहेत.   प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. आर. पाटील, उपमुख्याध्यापक श्री. चोपदार सर, पर्यवेक्षक श्री. भोई सर व सौ. आंबर्डेकर मॅडम, तसेच सूत्रसंचालक सौ एम एम भांडवले, सौ ए पी बागी व क्रीडाशिक्षिका वैजयंती पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.       

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची गरज: डॉ. संबोधी देशपांडे

महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची गरज: डॉ. संबोधी देशपांडे कोल्हापूर,  : महिल…