no images were found
लो चुडैल चली ससुरालमधील आपल्या भूमिकेबद्दल राखी एन विजान म्हणाल्या,
मुंबई, : कॉमेडी, फॅन्टसी आणि मजेशीर कौटुंबिक नाट्य यांचा संगम असलेली सोनी सबची लो चुडैल चली ससुराल ही मालिका उर्वशी (हिबा नवाब) हिची कथा सांगते. एक आनंदी स्वभावाची चुडैल असलेली उर्वशी एका माणसाशी लग्न करण्याचा निर्णय घेते आणि तिच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात करते. तिच्या प्रेमकथेला एक वेगळं वळण देणारी व्यक्ती म्हणजे तिची आई कमिनी, ही भूमिका राखी एन विजान साकारत आहेत.
कमिनीला तिच्या मुलीने एका माणसाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आवडत नाही आणि तिने चुडैल असण्याच्या पारंपरिक पद्धतींचंच पालन करावं, अशी तिची इच्छा असते. आपल्या ठाम मतांमुळे आणि अपेक्षांमुळे कमिनी, उर्वशी आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्यात स्वतःच्या शैलीतील विनोदाची रंगत आणते. राखींसाठी ही भूमिका स्वीकारणं म्हणजे त्यांना मनापासून आवडणाऱ्या क्षेत्रात पुन्हा काम करण्याची संधी होती. इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्षं काम करूनही, कॉमेडी आणि टेलिव्हिजन मालिकांमधील काम आजही त्यांना तितकंच उत्साहित करतं, विशेषतः एखाद्या पात्राला विनोदी बनवणारे छोटे-छोटे बारकावे. त्या कमिनीची भूमिका मनापासून एन्जॉय करत असून, हा अनुभव केवळ आणखी एक प्रोजेक्ट म्हणून न पाहता त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे.
कमिनीची भूमिका साकारण्याबद्दल बोलताना राखी एन विजान म्हणाल्या, “इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्षं काम करूनही, टेलिव्हिजन मालिकेत काम करणं आणि कॉमेडीमधील बारकावे अनुभवणं मला आजही खूप उत्साहित करतं. कॉमेडी माझ्याकडून इतक्या सहजपणे होते की ती अगदी नैसर्गिक वाटते. लो चुडैल चली ससुरालचा भाग असणं आणि कमिनीची भूमिका साकारणं मला खूप आवडत आहे. मला असं वाटत नाही की मी रोज कामावर जाते आहे, उलट मला असं वाटतं की मी पुन्हा माझ्याच घरी परत येते आहे. मी ही भूमिका स्वीकारली कारण मला या पात्राचा आनंद घ्यायचा आहे, त्यासोबत मजा करायची आहे आणि लोकांना हसवायचं आहे. कमिनीमुळे मला पुन्हा एकदा लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची संधी मिळाली आहे.”